मायणी : येथील चांदणी चौक परिसरातील तीन पान शॉप व एका हॉटेल चालकावर अशा चारजणांवर, निर्बंध असताना दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत मायणी पोलीस दूरक्षेत्रातून मिळालेली माहिती अशी, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेल्या नियमाप्रमाणे मायणी चांदणी चौक परिसरात सध्या अंशतः लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. फक्त अत्यावश्यक सुविधा देणाऱ्या आस्थापना उघड्या ठेवण्यास परवानगी आहे.परंतु बंद आस्थापनात समावेश असताना या परिसरातील तीन पान शॉप अँड जनरल स्टोअर्स व एक हॉटेल चालू असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे मायणी दूरक्षेत्रचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी करीत आहेत.
मायणी येथे चार दुकानदारांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 16:20 IST
CoronaVirus Satara : मायणी येथील चांदणी चौक परिसरातील तीन पान शॉप व एका हॉटेल चालकावर अशा चारजणांवर, निर्बंध असताना दुकाने सुरू ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
मायणी येथे चार दुकानदारांवर गुन्हे दाखल
ठळक मुद्देमायणी येथे चार दुकानदारांवर गुन्हे दाखलआपत्ती व्यवस्थापनअंतर्गत गुन्हा नोंद