शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवैद्य वाळू वाहतूकप्रकरणी तिघांवर गुन्हा, विधीसंघर्ष बालक ताब्यात; दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 14:13 IST

एका विधीसंघर्ष बालकासह तीन व्यक्ती डंपरमध्ये वाळूची बेकायदेशीर चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आले

फलटण : तालुक्यातील निभोरे ते मिरगाव रस्त्यावर विनापरवाना वाळू वाहतूक करताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करुन दहा लाखांचा किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी विधीसंघर्ष बालकासह दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत निभोरे ते मिरगांव जाणारे रोडने पांढरे–पिवळे रंगाच्या डंपरमधून काहीजण वाळूची बेकायदेशीर चोरटी वाहतूक करणार आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास मिळाली. त्यानुसार बुधवार, दि. २ रोजी रात्री दहाच्या सुमारास निभोरे ते मिरगाव जाणारे पालखी विसाव्याजवळील रस्त्यावर पथकाने सापळा रचून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर छापा टाकला. त्यात एक डंपर व कारचा वापर करुन एका विधीसंघर्ष बालकासह तीन व्यक्ती डंपरमध्ये वाळूची बेकायदेशीर चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आले. तीन ब्रास वाळूने भरलेल्या डंपर व एका अल्टो कारसह सर्वाना ताब्यात घेतले. प्रशांत सतीश भिसे (वय १९) व महेश उर्फ अक्षय विलास गायकवाड (वय २६, दोघे रा. सुरवडी ता. फलटण) यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एका विधीसंघर्ष बालकासह दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन तीन ब्रास वाळूने भरलेला डंपर व कार असा एकूण १० लाख ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला आहे.पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिले. सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा किशोर धुमाळ यांचे आदेशानुसार सहायक फौजदार दबडे, पोलीस हवालदार विश्वनाथ संकपाळ, राजकुमार ननवरे, संतोष पवार, पोलीस नाईक अमोल माने, अर्जुन शिरतोडे, स्वप्निल माने, शिवाजी भिसे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, मुनिर मुल्ला, प्रविण पवार, केतन शिंदे, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर