शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

थर्टी फर्स्टला रात्री उशिरा हॉटेल सुरू ठेवणाऱ्या तीन हॉटेलमालकांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 17:40 IST

31st December party CrimeNews Satara -सातारा जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून थर्टी फर्स्टला हॉटेल्स उशिरा सुरू ठेवल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील म्हसवे येथील हॉटेल मलबार, लिंब फाटा येथील ढाबा शेरे पंजाब आणि शेंद्रे हद्दीतील हॉटेल समरथल या तीन हॉटेलच्या मालकांवर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

ठळक मुद्देथर्टी फर्स्टला रात्री उशिरा हॉटेल सुरू तीन हॉटेलमालकांवर गुन्हा

सातारा: जिल्हाधिकार्‍यांचा आदेश डावलून थर्टी फर्स्टला हॉटेल्स उशिरा सुरू ठेवल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील म्हसवे येथील हॉटेल मलबार, लिंब फाटा येथील ढाबा शेरे पंजाब आणि शेंद्रे हद्दीतील हॉटेल समरथल या तीन हॉटेलच्या मालकांवर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी, कोरोनाच्या अनुषंगाने खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी थर्टी फर्स्टला रात्री उशिरा हॉटेल्स, ढाबे उघडे ठेवून गर्दी जमवू नये, असे आदेश दिले होते. या नियमाचे पालन होते की नाही यासाठी पोलिसांकडून ३१ डिसेंबरच्या रात्री गस्त सुरू होती.

यावेळी म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीतील हॉटेल मलबार रात्री ११.२० वाजता सुरू असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी हवालदार रवींद्र भोरे यांनी फिर्याद दिल्यानुसार हॉटेलचालक मनचूर आमचुंडी गंडी याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक पाटोळे करत आहेत.दरम्यान, लिंब फाटा येथेही थर्टी फर्स्टला रात्री पाऊण वाजता ढाबा शेर ए पंजाब सुरू असल्याचे पोलिसांना दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी ढाबा मालक दिल प्रीतसिंह हरजितसिंह (वय २२, रा. डेहराडून, उत्तराखंड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तपास हवालदार बागवान करत आहेत.त्याचप्रमाणे ३१ डिसेंबर होऊन गेल्यावरही पहाटे सव्वातीन वाजेपर्यंत शेंद्रे फाट्यावरील हॉटेल समरथल सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी पोलीस नाईक दीपक पोळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हॉटेल मालक राजू बिष्णोई (३६, रा. शेंद्रे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीhotelहॉटेलCrime Newsगुन्हेगारीcollectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर