शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटासाठी धमकावल्याने महिला पोलिसासह एका पोलिसावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 16:08 IST

Police Satara : घटस्फोट द्यावा म्हणून एकाला दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसह अन्य एका पोलीस कॉन्स्टेबलवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मनीषा चौधरी आणि जगदीश कोकणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही पोलीस मुख्यालयात सेवेत आहेत. दरम्यान, महिला पोलिसासह अन्य एका पोलिसावर गुन्हा दाखल झाल्यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देघटस्फोटासाठी धमकावल्याने महिला पोलिसासह एका पोलिसावर गुन्हासातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ

सातारा : घटस्फोट द्यावा म्हणून एकाला दमदाटी केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एका महिला पोलीस कॉन्स्टेबलसह अन्य एका पोलीस कॉन्स्टेबलवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मनीषा चौधरी आणि जगदीश कोकणी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही पोलीस मुख्यालयात सेवेत आहेत. दरम्यान, महिला पोलिसासह अन्य एका पोलिसावर गुन्हा दाखल झाल्यामुळे सातारा जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, मनीषा आणि दीपक चौधरी (रा. गोळीबार मैदान, सातारा) हे पती-पत्नी असून मनीषा या पोलीस मुख्यालयात पोलीस कॉन्स्टेबल आहेत. मनीषा यांनी शनिवार, दि. १० एप्रिल रोजी रात्री अकरा वाजता जगदीश कोकणी याला घरी बोलावून घेतले.

यावेळी मनीषा हिने दीपक यांना 'मला आत्ताच्या आता घटस्फोट पाहिजे आणि घटस्फोट नाही दिला तर आम्ही तुमच्या जिवाचे काहीतरी बरे वाईट करून आमच्याही जिवाचे बरेवाईट करून घेऊ,' अशी धमकी दिली. यानंतर दीपक यांना शिवीगाळ करत धमकी देण्यात आली. मात्र, दीपक हे ऐकत नसल्याचे पाहून या दोघांनीही त्यांना संगनमत करून मारहाण केली. दरम्यान, जगदीश कोकणी याने दीपक यांना वारंवार फोन करून मनीषा हिला घटस्फोट दे, असे म्हणून धमकीही दिली.

टॅग्स :PoliceपोलिसSatara areaसातारा परिसर