शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना फलकप्रकरणी नगराध्यक्षांच्या पतीवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 10:58 IST

Crime News Karad Police Satara : सार्वजनिक ठिकाणी फलक लाऊन विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवत कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश आनंदराव शिंदे यांच्यावर कऱ्हाड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचे निरिक्षक मिलिंद शिवाजीराव शिंदे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्देविनापरवाना फलकप्रकरणी नगराध्यक्षांच्या पतीवर गुन्हाकऱ्हाडातील घटना : पालिकेच्या आरोग्य निरीक्षकांची फिर्याद

कऱ्हाड : सार्वजनिक ठिकाणी फलक लाऊन विद्रुपीकरण केल्याचा ठपका ठेवत कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांचे पती उमेश आनंदराव शिंदे यांच्यावर कऱ्हाड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाचे निरिक्षक मिलिंद शिवाजीराव शिंदे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या विजयाबद्दल उमेश शिंदे यांनी हा फलक लावला होता. मात्र, विनापरवाना लावलेल्या या फलकामुळे सार्वजनिक ठिकाणाचे विद्रुपीकरण झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे यांना २ जुलै रोजी शहरात पाहणी करून विनापरवाना फलकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मिलिंद शिंदे दोन कर्मचाऱ्यांसह शहरात पाहणी केली. त्यावेळी त्यांना बनपूरकर कॉलनी परिसरात सहकार पॅनेलच्या विजयाचा आठ बाय दहा फूट विनापरवाना फलक दिसला.

डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश आनंदराव शिंदे यांनी तो फलक लावल्याचे दिसून आले. यासंदर्भात त्यांना विनापरवाना फलक लावल्याबद्दल नोटीस बजावली होती. मात्र, आजपर्यंत त्याचा खुलासा उमेश शिंदे यांनी केला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी विद्रुपीकरण केले म्हणून तक्रार दाखल करण्यात आली. याबाबत आरोग्य निरिक्षक मिलिंद शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर