शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

CoroanVirus Satara : साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १५ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 13:14 IST

CoroanVirus Satara : कोरोना महामारीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असतानाही सातारा शहर, तसेच परिसरात विनाकारण फिरणे, विनामास्क फिरणारे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एक फुलविक्रेतेचाही समावेश आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १५ जणांवर गुन्हाफुलविक्रेत्यावरही कारवाई

सातारा : कोरोना महामारीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असतानाही सातारा शहर, तसेच परिसरात विनाकारण फिरणे, विनामास्क फिरणारे पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये एक फुलविक्रेतेचाही समावेश आहे.याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी, पोवई नाका परिसरात सार्वजनिक रस्त्यावर विनाकारण फिरून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अकील अमीर काझी (वय ३४, रा. पीरवाडी, सातारा), अभय सुका महाली (वय ५३, रा. भोसले कॉलनी, कोडोली, सातारा), तनुश्री, चैतन्य भिसे (वय २७, रा. वाढेफाटा, सातारा) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक सुनील कर्णे यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पी.एल. भिसे करत आहेत.सातारा शहर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल विकास शिंदे यांनीही एक तक्रार दिली असून, त्यांच्या तक्रारीनंतर सुयोग राजकुमार वनारसे (वय ४८, रा. निशिगंधा हाउसिंग सोसायटी, एमआयडीसी, सातारा), प्रशांत प्रभाकर सोनमळे (वय ३७, रा. पीरवाडी, सातारा), राजू गुरप्पा चव्हाण (वय २७, संजीवनी सोसायटी, शाहूनगर, सातारा) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जी.बी. कारळे करत आहेत.सातारा शहर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संभाजी जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अल्ताफ जमाल शेख (वय ५५), अत्तार अल्ताफ शेख (वय २०, दोघे रा. रविवार पेठ, सातारा), सनिराज नामदेव जाधव (वय २५, रा. क्षेत्रमाहुली, सातारा), महम्मद कलाम अमीर शेख (वय ६८, रा. ब्लू प्लाझा अपार्टमेंट, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पी.एल. भिसे करत आहेत.पोलीस कॉन्स्टेबल किशोर तारळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मोहित मगनलाल जैन, वक्ताराम आसाराम देसाई (वय ३०, रा. मोळाचा ओढा, आयटीआय, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार जी.बी. कारळे करत आहेत.दीपक कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ओमकार बापूसाहेब कणसे (रा. अंगापूर वंदन, ता. सातारा), विठ्ठल ज्ञानदेव देवगिरी (वय ६६, रा. शिवकृपा अपार्टमेंट, उत्तेकरनगर, सदरबझार, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पी.एल. भिसे हे करत आहेत.फुलविक्रेत्यावरही कारवाईकोरोना महामारीत सातारा शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलल्यानंतरही अजूनही काही जणांकडून त्याचे उल्लंघन होत आहे. पोवई नाक्यावर एका फुलविक्रेत्यावरही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून सांगण्यात आले की, पोवई नाक्यावर मराठा खानावळीच्या शेजारी असलेले नीलकमल फ्लॉवर हे दुकान सुरू ठेवून त्याच्या मालकीची चारचाकी (एमएच- १५ ईपी- ३५७५) फुलांनी सजवत होता. ही बाब लक्षात आल्यानंतर त्याच्यासह भीमराव नामदेव वाघांबरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पोलीस हवालदार जी.बी. कारळे हे करत आहेत. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार संजय सपकाळ यांनी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर