शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

कोयनेत ४१ हजार क्युसेक पाण्याची आवक, साठा ३९.१० टीमएसीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 16:27 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला असलातरी जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. कोयनेत तर २४ तासांत ४१ हजार १८५ क्युसेक पाण्याची आवक झाली.

ठळक मुद्देकोयनेत ४१ हजार क्युसेक पाण्याची आवक, साठा ३९.१० टीमएसीवर जिल्ह्यातील धरणक्षेत्रांमध्ये गतवर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी-अधिक

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात शुक्रवारपासून पावसाचा जोर काहीसा मंदावला असलातरी जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे.

कोयनेत तर २४ तासांत ४१ हजार १८५ क्युसेक पाण्याची आवक झाली. शनिवारी सकाळपर्यंत धरणातील साठा ३९.१० टीएमसीवर पोहोचला होता. तरण गतवर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील धरण परिसरात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने वेळेत हजेरी लावली. सुरूवातीला काही दिवस पाऊस कोसळला. पश्चिम भागासह पूर्व दुष्काळी भागातही दमदार पाऊस बरसला. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली. काही दिवसांच्या अवधीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला.

गेल्या एक महिन्याच्या काळात पावसाने तीनवेळा उघडीप दिली आणि पुन्हा हजेरी लावली. सोमवारी दुपारपासून पश्चिम भागात पुन्हा पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. गेल्या सहा दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. तर शुक्रवारी काही प्रमाणात पावसाचा जोर मंदावला होता. तर शनिवारपासून पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ९६ तर आतापर्यंत १४९० मिलीमीटर पाऊस झाला आहे. धोम धरणात २५२६ क्युसेक पाण्याची आवक झाली असून साठा ४.१७ टीएमसीवर पोहोचला आहे. कण्हेरमध्ये ४५८० क्युसेकची आवक होऊन साठा ३.१५ तर उरमोडीत ४१२२ क्युसेक पाण्याची आवक होऊन साठा ४.३२ टीएमसीवर गेला आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत धरणक्षेत्रात पाऊस कमी अधिक प्रमाणात झाला आहे.

गेल्यावर्षी ७ जुलैपर्यंत कोयनानगर येथे १४.५ तर आता १४९० मिलीमीटर पाऊस झाला आहे. कण्हेरला गतवर्षी २२९ तर आता २३९, उरमोडी गेल्यावर्षी ३१७ तर यावर्षी ३४२ मिलीमीटर पाऊस झाला आहे.धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्येधोम ४४ (२४८) कोयना ९६ (१४९०) बलकवडी ७४( ६७६ ) कण्हेर ०४ (२३९) उरमोडी ०६ (३१७) तारळी २० (४६०) साताऱ्यात पुन्हा हजेरी...साताऱ्यात सहा दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. यामुळे सातारकरांना सूर्यदर्शन झालेच नव्हते. शुक्रवारी पावसाने थोडीशी उघडीप दिली. पण, शनिवारी सकाळपासूनच पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे साताऱ्यात सतत पाऊस होत आहे.

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर