शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय युवकाकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 17:14 IST

सातारा येथील वाढे फाट्यावर परप्रांतीय युवकाकडून स्थानिक गुन्हे शाखेने एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली.

ठळक मुद्देपरप्रांतीय युवकाकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे जप्तएकजण फरार : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : येथील वाढे फाट्यावर परप्रांतीय युवकाकडून स्थानिक गुन्हे शाखेने एक गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली.दीपक अंगर यादव (वय ३०, रा. अवथही, तहसील मुहमदाबाद, जि. गाझिपूर, राज्य उत्तर प्रदेश) असे अटक झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वाढे फाट्यावर एक युवक पिस्टल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमला शनिवारी दुपारी तेथे तत्काळ पाठविले.

राखाडी रंगाचा शर्ट, चॉकलेटी रंगाची पॅन्ट, सावळा रंग असलेला युवक तेथे संशयितरित्या फिरत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्याने आपले नाव दीपक यादव असे सांगितले. त्याचा साथीदार सोनू यादव (रा. बस्कर,बिहार) हा तेथे येणार होता. त्याला हे पिस्टल देण्यात येणार होते.

तत्पूर्वीच दीपकला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे रोख रक्कम असा सुमारे ८५ हजार ३८० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. मात्र, सोनू यादव हा फरार झाला आहे.सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, ज्योतिराम बर्गे, विनोद गायकवाड, मोहन नाचन, योगेश पोळ, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, मयूर देशमुख, वैभव सावंत यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर