शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 साताऱ्यात मतमोजणीला लागणार १२ तास--: जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 17:33 IST

Maharashtra Assembly Election 2019मतमोजणीच्या प्रत्येक राउंडसाठी तब्बल २0 मिनिटांचा वेळ लागेल, त्यामुळे तब्बल १२ तास मतमोजणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणूक आल्याने एकाच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया घ्यावी लागली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि सहा विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी २४ रोजी साता-यातील वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीच्या प्रत्येक राऊंडसाठी प्रत्येकी २0 मिनिटे लागणार असून रात्री ८ वाजेपर्यंत ही मतमोजणी प्रक्रिया सुरु राहणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी म्हणाल्या, सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक व आठ विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीत ६७ टक्के मतदान झाले. निवडणूक विभागाने दिलेल्या अंतीम आकडेवारीनुसार लोकसभेसाठी १२ लाख ३९ हजार ५४८ तर विधानसभेसाठी १६ लाख ७९ हजार ७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. जिल्ह्यातील २९७८ मतदान केंद्रावरुन कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये मतदान यंत्रे मतमोजणीच्या ठिकाणी नेण्यात आली. सातारा, वाई, कोरेगाव, क-हाड उत्तर, क-हाड दक्षिण, पाटण या सहा मतदारसंघातील मतदान यंत्रे सातारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या वखार महामंडळाच्या गोदामात आणून ठेवण्यात आली.

याच ठिकाणी लोसभा व सहा विधानसभा मतदारसंघांची गुरुवार, दि. २४ रोजी मतमोजणी प्रक्रिया राबविली जाणार आहे. तर फलटण व माण मतदारसंघांची अनुक्रमे फलटण व दहिवडी या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे.मतमोजणीची पूर्ण तयारी झाली असून सहा विधानसभा मतदारसंघांसाठी स्वतंत्र मतमोजणी हॉल असणार आहे. प्रत्येक हॉलमध्ये लोकसभेसाठी त्या त्या विधानसभा मतदारसंघातून झालेल्या मतदानाची मोजणीही केली जाणार आहे.

सातारा विधानसभा मतदारसंघाची १४ टेबलवर मतमोजणी होणार असून ३१ राउंड घ्यावे लागणार आहे. पाटणसाठी १२ टेबलवर तर ३३ राऊंड, वाईची ११ टेबलवर मतमोजणीचे ३२ राउंड होतील. कोरेगावची ११ टेबलवर ३२ राउंड होतील. क-हाड उत्तरची ११ टेबलवर ३१ राउंड होतील. क-हाड दक्षिणची १0 टेबलवर ३0 राउंड होतील. मतमोजणीच्या प्रत्येक राउंडसाठी तब्बल २0 मिनिटांचा वेळ लागेल, त्यामुळे तब्बल १२ तास मतमोजणी प्रक्रिया सुरु राहणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी लोकसभा निवडणूक आल्याने एकाच ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया घ्यावी लागली आहे.प्रत्यक्ष मतमोजणी टेबलावर सातारा येथे ११७८ कर्मचारी असतील. तर फलटण व माण येथे मिळून १२६ कर्मचारी असतील तर मतमोजणीच्या ठिकाणी एकूण ३ हजार कर्मचारी काम पाहतील. तर २ हजार पोलीस कर्मचारी बाहेर पहारा देणार आहेत.मतदानावेळी मशिन बदलाव्या लागल्यामतदान प्रक्रियेवेळी बिघाड झाल्याने बॅलेट युनिट, व्हीव्हीपॅट व सीयु या मशिन्स बदलाव्या लागल्या. बॅलेट युनिट व सीयु या प्रत्येकी २0 तर ११२ व्हीव्हीपॅट मशिन्स ऐनवेळी बदलण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकाºयांनी दिली.

 

  • निकालाच्या ठिकाणी गर्दी करु नये : पोलीस अधीक्षक

नागरिकांना लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा निकाल घरात बसूनही पाहता येणार आहे. सोशल मिडियावर तसेच महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही निकाल पाहता येणार असल्याने नागरिकांनी मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी करु नये. मतमोजणीनंतर दिवाळी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर