पाटणची मतमोजणी देसाई महाविद्यालयात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:32 IST2021-01-15T04:32:26+5:302021-01-15T04:32:26+5:30

प्रशांत थोरात म्हणाले, तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण १०६ मतदान केंद्रांवर मतदारांसाठी ...

The counting of votes for Patan will be held at Desai College | पाटणची मतमोजणी देसाई महाविद्यालयात होणार

पाटणची मतमोजणी देसाई महाविद्यालयात होणार

प्रशांत थोरात म्हणाले, तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण १०६ मतदान केंद्रांवर मतदारांसाठी मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी मतदान यंत्रे सज्ज करण्यात आली आहेत. तसेच १० टक्के राखीव मतदान यंत्रे ठेवण्यात येतील.

प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्षासह पाच मतदान कर्मचारी आणि एक पोलीस कर्मचारी अशी व्यवस्था असणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १५ झोनल ऑफिसर यांची नेमणूक केली जाणार आहे. १४ जानेवारी रोजी रात्री उशिरापर्यंत सर्व मतदान कर्मचारी आणि मतदान यंत्रे संबंधित मतदान केंद्रावर पोहोचतील. १८ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. एकूण १८ टेबलांवर मतमोजणीच्या १० फेऱ्या होतील. मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Web Title: The counting of votes for Patan will be held at Desai College