शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown :उत्पादन शुल्कच्या महसुलाला लागले उंदीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 12:35 IST

मद्यविक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या कोट्यवधी महसुलाला जिल्ह्यात उंदीर लागले आहेत. काळ्या बाजारात चढ्या दराने मद्यविक्री सुरू असून, तळीराम मोठ्या प्रमाणावर मद्य खरेदी करत आहेत. प्रचंड मोठ्या नफेखोरीच्या धंद्यात अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. उत्पादन शुल्कला लागलेले उंदीर शोधून काढायची आता वेळ आलेली आहे.

ठळक मुद्देउत्पादन शुल्कच्या महसुलाला लागले उंदीर!मद्य विक्रीवरील बंदी : शासनाच्या तिजोरीत पडेना छदाम

सागर गुजरसातारा : मद्यविक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या कोट्यवधी महसुलाला जिल्ह्यात उंदीर लागले आहेत. काळ्या बाजारात चढ्या दराने मद्यविक्री सुरू असून, तळीराम मोठ्या प्रमाणावर मद्य खरेदी करत आहेत. प्रचंड मोठ्या नफेखोरीच्या धंद्यात अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. उत्पादन शुल्कला लागलेले उंदीर शोधून काढायची आता वेळ आलेली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून अधिकृत मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचा आदेश शासनाने दिला असताना देखील जिल्ह्यात अनेक मद्यपी झिंगून टाईट राहत आहेत. दारुबंदी असतानाही हे मद्य नक्की येते कुठून उत्पादन शुल्क विभाग या विक्रीकडे कानाडोळा का करत आहे? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

काळ्या बाजाराने दारू विकणाऱ्यांवर कोरोना लॉकडाऊनच्या काळात एकही कारवाई का झालेले नाही? संपूर्ण राज्यामध्ये कंटेन्मेंट झोन वगळता इतर झोनमध्ये मद्य विक्रीला राज्य शासनाने परवानगी दिलेली आहे, असे असताना सातारा जिल्ह्यात ही परवानगी का दिली जात नाही? शासनाच्या तिजोरीत मद्य विक्रीतून मोठा महसूल जमा होणार असेल तरी बंदी का घातली गेली आहे. मद्यावर ज्यादा कर आकारला गेला असता तरीदेखील मद्याची विक्री थांबली नसती असे अंदाज अनेकजण व्यक्त करतात.एका बाजूला केंद्र शासनाने इंधन विक्रीवर मोठा कर लादला आहे. सामान्यांच्या खिशातून या कराचे पैसे उकळले जाणार आहेत तर कर लावून देखील मद्य खरेदीसाठी रांगा कायम राहिल्यास हे लोक स्वत:हून शासनाची तिजोरी भरण्यासाठी हिरीरीने पुढे येत आहेत.

हा विनासायास मिळणारा महसूल सोडून आता पेट्रोल डिझेलवर सक्तीने कर लावण्यात आल्याने कोरोनाच्या काळात पैशाच्या अडचणीमुळे कोंडीत सापडलेल्या सामान्य लोकांना देशोधडीला लावण्याचा प्रकार केंद्र सरकारने सुरू केल्याचा आरोप होत आहे. या निर्णयामुळे वाहतूक खर्च वाढवून जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही प्रचंड मोठी वाढ होण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे.

मद्य विक्री सुरू करण्यास परवानगी दिली तर इतर जिल्ह्याप्रमाणे आपल्याकडेही मोठी गर्दी रस्त्यावर येऊ शकते. यातून सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो म्हणून आणखी काही दिवस मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्यात आलेली आहे.-शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर