शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

CoronaVirus Lockdown : बामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 16:13 IST

बामणोलीसह तापोळा येथे जलसफारीसाठी बोटिंग व्यवसाय प्रसिद्ध आहे. यावरच अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; पण कोरोनामुळे पर्यटन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे, तसेच दररोजची देखभालही परवडत नसल्याने बामणोली परिसरातील बोल मालकांनी बोटी जमिनीवर काढल्या आहेत.

ठळक मुद्दे बामणोलीत मालकांनी आपापल्या बोटी जमिनीवर काढल्याआर्थिक संकट ; लॉकडाऊन तसेच दररोजची देखभाल करणे परवडेना

बामणोली : बामणोलीसह तापोळा येथे जलसफारीसाठी बोटिंग व्यवसाय प्रसिद्ध आहे. यावरच अनेकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो; पण कोरोनामुळे पर्यटन क्षेत्रावरही परिणाम झाला आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आहे, तसेच दररोजची देखभालही परवडत नसल्याने बामणोली परिसरातील बोल मालकांनी बोटी जमिनीवर काढल्या आहेत.यंदाच्या पावसाळ्यात इटली, जपान, स्पेन येथील पर्यटकांनी या भागाला भेट देऊन ह्यअमेझिंग प्लेसह्ण असे येथील निसर्गसौंदर्याचे वर्णन केले होते. येथील हिरवागार निसर्ग व शिवसागर जलाशयाचे मनमोहक दृश्य अनेकांना मोहीत करत असते. जलसफारीसाठी तापोळा, बामणोलीला पाच बोट क्लब आहेत. त्यांच्या मोटर लाँच, स्पीड बोट, पेंडल बोट, रोर्इंग बोट तसेच स्कूटर यांची संख्या हजारोंच्या घरात आहेत.

सध्या या लाँचेसना एकही पर्यटक व प्रवासी मिळत नसल्याने पंधरा दिवसांपासून या बोटी जाग्यावरच पाण्यात बांधलेल्या आहेत. परंतु या बोट मालकांना दररोज नदीकिनारी जाऊन बोटीत येणारे पाणी काढावे लागत आहे. तसेच पाण्याची पातळी सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे दररोज तीन ते चार फुटांनी घटत आहे. त्यामुळे दररोज सकाळी नदी बाहेर कोरड्या जागेत असणारी बोट पाण्यात ढकलावी लागत आहे. त्यामुळे दररोज ही अनावश्यक धडपड करावी लागत आहे. अनेक बोट मालकांनी आपल्या बोटी आतापासूनच पाण्यातून बाहेर काढून कोरड्या पात्रात ओढून ठेवण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या वर्षी मे महिन्यातच नदीपात्र कोरडे पडले होते. त्यामुळे बोटचालकांचा चार महिन्यांचा व्यवसाय बुडाला होता. परंतु यावर्षी पाणी जास्त असूनही केवळ कोरोना संकटामुळे पर्यटक नाहीत. धंदा नाही, त्यामुळे बँकेचे घेतलेले कर्ज व कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? या चिंतेत बोटमालक आहेत. त्यामुळे बोटी बाहेर काढून ठेवलेल्याच बऱ्या या निर्णयापर्यंत अनेक बोट मालक आले आहेत.

गतवर्षी नदीपात्र कोरडे पडले होते. यंदा नदीत पाणीही जास्त आहे. वासोट्यामुळे धंदाही चांगला होत होता. परंतु लॉकडाऊनमुळे पंधरा दिवस दररोज नदीकाठी जाऊन बोटीतील पाणी काढणे व लाँच पाण्यात ढकलणे एवढेच काम करावे लागत आहे. कर्जाचे हप्ते कसे फेडायचे? हाच प्रश्न आहे.- आनंदा भोसले,बोट मालक, मुनावळे, ता. जावळी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरKas Patharकास पठार