शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : मायणीच्या पेरू बागांना लॉकडाऊनचा फटका, लाखोंचे पेरू बागेतच पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 15:07 IST

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येथील पेरू बागांना मोठा फटका बसला आहे. बागायतदारांचे लाखो रुपयांचे पेरू विक्रीविना बागेतच पडून राहिले आहेत.

ठळक मुद्दे मायणीच्या पेरू बागांना लॉकडाऊनचा फटका, लाखोंचे पेरू बागेतच पडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची बागायतदारांमधून मागणी

संदीप कुंभारमायणी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत सर्वत्र लॉकडाऊन असल्याने येथील पेरू बागांना मोठा फटका बसला आहे. बागायतदारांचे लाखो रुपयांचे पेरू विक्रीविना बागेतच पडून राहिले आहेत.सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात मागणी प्रतिवर्षी मायणीच्या पेरूंची असते. परिसरामध्ये शेकडो हेक्टर क्षेत्रांमध्ये पेरूची लागण केली जाते. विविध पेरूंच्या जाती या भागामध्ये आहेत.

या पेरूंना मोठी मागणी असल्यामुळे अनेक शेतकरी पेरू उत्पादन घेत असतात. साधारणपणे एका हेक्टरमध्ये दीड ते दोन हजार पेरू रोपांची लागण केली जात असते. प्रत्येक गावात साधारण एक ते तीन लाखांपर्यंत उत्पादन या भागातील बागायतदार बाराही महिने पेरूचे उत्पादन घेतले जाते.मात्र, यावर्षी संपूर्ण जगभरामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनामार्फत संपूर्ण भागांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे पेरू खरेदी-विक्री करण्यासाठी ग्राहक वर्ग नसल्यामुळे व्यापारी वर्गांनी पाठ फिरवली आहे. याचा फटका पेरू बागांना बसला आहे.

परिसरामध्ये असलेले पेरू उत्पादक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. विक्रीयोग्य पेरू असतानाही केवळ बाजारपेठ बंद असून, नागरिकांना व ग्राहकांनाही संचारबंदी करण्यात आल्यामुळे तसेच दळणवळण ही मोठ्या प्रमाणात चालू नसल्यामुळे सर्व क्षेत्रात याचा फटका बसत असलेले चित्र दिसत आहे. शासनाने या परिसरामध्ये झालेल्या बागांचे खऱ्या अर्थाने पंचनामे करून बागायतदारांना नुकसान भरपाई देणेही गरजेचे असल्याचे बागातदार याकडून बोलले जात आहे.मायणीच्या पेरूला राज्यात मागणी...मायणी परिसर हा पेरू उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. या पेरूची राज्यांमध्ये मोठी मागणी असते. विशेष करून पश्चिम महाराष्ट्रसह कोकण किनारपट्टीवर त्या प्रमाणात मायणीचा पेरू विकला जात असतो. मात्र, यावर्षी या पेरूला मोठा फटका बसला आहे.

एक एकर क्षेत्रामध्ये सुमारे ७०० पेरूंची झाडे असतात. या प्रत्येक एकरामध्ये प्रतिदिनी पाच ते दहा हजार रुपयांचा पेरू विक्रीयोग्य होत असतो. मात्र, यावर्षी लॉकडाऊन असल्यामुळे ही विक्री बंद असल्यामुळे पेरू बागेतच सडून जात आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून लाखोंचा तोटा झाला आहे.- संजय गुदगे, पेरू उत्पादक, मायणी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरFarmerशेतकरी