शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

CoronaVirus Lockdown : साताऱ्यातून साडेचारशे परप्रांतीय विनापरवाना गेले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 17:41 IST

लॉकडाऊनमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असणारी उपासमार अन् हाताला काम नाही. गावी जाण्यासाठी परवानगी मिळेलच, याची शाश्वतीही नसल्यामुळे आॅनलाईन नोंद करूनही सुमारे साडेचारशे परप्रांतीय कामगार साताऱ्यातून विनापरवाना गावी रवाना झाल्याची माहिती पुढे येत आहे. 

ठळक मुद्देसाताऱ्यातून साडेचारशे परप्रांतीय विनापरवाना गेले घरीलॉकडाऊन वाढण्याची धास्ती; साताऱ्यातून दीडशे परप्रांतीयांना रविवारी सोडले

सातारा : लॉकडाऊनमध्ये दोन महिन्यांपासून सुरू असणारी उपासमार अन् हाताला काम नाही. गावी जाण्यासाठी परवानगी मिळेलच, याची शाश्वतीही नसल्यामुळे आॅनलाईन नोंद करूनही सुमारे साडेचारशे परप्रांतीय कामगार साताऱ्यातून विनापरवाना गावी रवाना झाल्याची माहिती पुढे येत आहे. कोरोनाच्या महामारीमुळे सध्या सर्वच कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आलीय. प्रत्येकाला आता आपल्या घरी जाण्याची ओढ लागलीय. जिल्हा प्रशासनातर्फे अशा परप्रांतीय कामगारांना आॅनलाईन पास देण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामध्ये सुरुवातीला सातशे कामगारांनी आपल्या गावी जाण्यासाठी नोंद केली.

गत आठवड्यात पहिल्या टप्प्यात तीनशे कामगारांना रेल्वेने गावी सोडण्यात आले. त्यानंतर उर्वरित राहिलेल्या कामगारांना रविवारी सोडण्यात येणार होते. त्यासाठी साताऱ्यातील तालीम संघाच्या मैदानावर रेल्वे स्टेशनवर सोडण्यासाठी पाच एसटी बसेसचीही सोय करण्यात आली. यावेळी केवळ दीडशे कामगार या ठिकाणी आले.

मात्र, आॅनलाईन नोंद करूनही तसेच नोंद न केलेले उर्वरित सुमारे साडेचारशे कामगार गावी जाण्यासाठी आले नाहीत. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी परप्रांतीय कामगारांकडे चौकशी केली असता त्यांनी काही दिवसांपूर्वीच अनेकजण गावी गेल्याचे सांगितले.आॅनलाईन पास मिळाला नाही तर आम्ही इथेच अडकून पडू, अशी धास्ती वाटल्याने अनेक कामगारांनी आॅनलाईन परवानगीची वाट न पाहता गावी जाणे पसंत केले आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने कामगार गावी गेले असतील तर त्यांना वाटेत कोणी अडवले कसे नाही, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाची संपर्क साधला असता आमच्याकडे अधिकृत आकडेवारी नसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर