शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : ई-पाससाठी पैसे उकळणाऱ्यावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 16:16 IST

लॉकडाउनमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी सातारा पोलिसांचा आवश्यक असलेला पास मिळवून देण्याच्या नावाखाली तीनशे रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहरातील सोमवार पेठेतील महालक्ष्मी आॅनलाईन सेवा या दुकानातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देई-पाससाठी पैसे उकळणाऱ्यावर गुन्हाअनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

सातारा : लॉकडाउनमध्ये बाहेरगावी जाण्यासाठी सातारा पोलिसांचा आवश्यक असलेला पास मिळवून देण्याच्या नावाखाली तीनशे रुपये उकळल्याप्रकरणी सातारा शहरातील सोमवार पेठेतील महालक्ष्मी आॅनलाईन सेवा या दुकानातील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी, महेश चंद्रकांत साळुंखे (रा. सदाशीव पेठ, सातारा) यांच्या मुलीला सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथून साताऱ्यात यायचे होते. त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यासाठी त्यांनी शहरातील सोमवार पेठेतील आकांक्षा कॉर्नर येथे असलेल्या महालक्ष्मी ई-सेवा केंद्रातून जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर अर्ज केला होता.

मात्र, तो अर्ज भरून देण्यासाठी कोणतेही शुल्क न घेण्याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांनी आदेश दिलेले असतानाही संबंधित सेवा केंद्रातील एका अनोळखी व्यक्तीने त्यांच्याकडून तीनशे रुपये घेतले.

तसेच त्यांचा अर्ज चुकीच्या पद्धतीने भरला. त्यामुळे त्यांच्या मुलीला साताऱ्यात येण्यास परवानगी मिळाली नसल्याने त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात संबंधित केंद्रातील अनोळखी व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर