शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: "...तर एकही मराठा घरी दिसणार नाही" जरांगे पाटलांचा इशारा
2
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
3
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
4
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
5
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
6
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
7
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
8
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
9
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
10
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
11
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
12
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
13
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
14
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
15
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
16
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
17
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
18
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
19
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
20
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?

कोरोनाचे रुग्ण वाढताच प्रशासनाची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:46 IST

वडूज : जिल्ह्यासह खटाव तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वडूज शहरात ३६, ...

वडूज : जिल्ह्यासह खटाव तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. वडूज शहरात ३६, तर मांडवे गावात कोरोनाचे ४१ रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. संक्रमणाचा धोका वाढल्याने आता नागरिकांनीदेखील काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

खटाव तालुक्यात आजवर आढळून आलेल्या ४ हजार २४७ रुग्णांपैकी ३ हजार ९८० रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणा समाधानकार असताना तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनाच्या चिंतित भर पडली आहे. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरात ३६, तर वडूजपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवे गावात ४१ रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

सण, उत्सवानिमित्त होणाऱ्या भेटीगाठी, खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी, प्रवास आणि पर्यटन अशा अनेक कारणांमुळे सध्या सर्वत्रच कोरोना वाढीचा आलेख वाढत चालला आहे. राज्याच्या आरोग्य यंत्रणेनेदेखील कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्यादृष्टीने उपाययोजना करण्याचे काम हाती घेतले आहे. सध्या वडूज शहर व परिसरातील गावांत कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्याने चिंतेतही वाढ झाली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी राज्य शासनाने ठरवलेल्या १० कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी खटाव तालुक्यातील विविध गावांत तातडीने सुरू करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

(पॉइंटर)

तालुक्यातील कोरोना स्थिती

कोरोनाबाधित ४२४७

कोरोनामुक्त ३९८०

उपचार सुरू ११३

आजवर मृत्यू १५४ मयत

(कोट)

सध्या नागरिक कोरोनाबाबतीत योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जसे गर्दी टाळणे, मास्कचा नियमित वापर करणे, सॅनिटायझर वापरणे या गोष्टींची पुन्हा काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन होणे गरजेचे आहे. कोरोना अजून गेलेला नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

- डॉ. युनूस शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी

फोटो : कोरोना लोगो