सातारा : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने जिल्ह्यातील कोरोना योध्दा युवतींचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त कोरोना योध्दा सन्मान हा कार्यक्रम घेण्यात आला.
साताऱ्यातील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याहस्ते कोरोनाकाळात निर्भीडपणे काम केलेल्या युवतींचा सन्मान करण्यात आला. यावेळी मोना निकम, रेश्मा गाडेकर, अपर्णा निकम, मोहिनी जाधव, अश्विनी साबळे, मृणाल शिंदे या युवतींचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राजकुमार पाटील, सुरेखा पाटील, समींद्रा जाधव, जयश्री पाटील, उषा जाधव, स्मिता देशमुख, पूजा काळे, शुभांगी कांबळे, कोमल घोरपडे, सिद्धी साळुंखे आदी उपस्थित होते.