शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये साताऱ्यात अन् रहिमतपूरला दारूविक्रीवर धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 16:22 IST

लॉकडाउन असतानाही लपून-छपून दारू विक्री करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर आणि सातारा शहरामध्ये पोलिसांनी कारवाई करून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३० हजारांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये साताऱ्यात अन् रहिमतपूरला दारूविक्रीवर धडक कारवाईपाचजणांना अटक ; एक लाख ३० हजारांचा ऐवज जप्त

सातारा : लॉकडाउन असतानाही लपून-छपून दारू विक्री करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर आणि सातारा शहरामध्ये पोलिसांनी कारवाई करून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३० हजारांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे.देवराज मोहन कोकीळ (वय २९, गणेशनगर, विलासपूर, सातारा), प्रसाद विकास महामुने (वय २२, रा. कारंजकर नगर, विलासपूर, सातारा), विशाल सुधीर कारंजकर (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव), तोहफिक नजीर नदाफ (वय २३, रा. रहिमपूर, ता. कोरेगाव), बार मालक सचिन सूर्यकांत बेलागडे (वय ४८, रा. रोकडेश्वर गल्ली, रहिमतपूर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. यामधील विशाल कारंजकर हा दोन्ही घटनांमध्ये समावेश होता.याबाबत अधिक माहिती अशी, साताºयातील उपनगर असलेल्या करंजकर विलासपूरमधील एका बोळामध्ये दि. २० रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता तीनजण दारू विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला.या ठिकाणी पोलिसांना देवराज कोकीळ, प्रसाद महामुने आणि विशाल कारंजकर हे तिघे सापडले. त्यांच्याकडून विविध प्रकारचा दारूसाठा सुमारे ८६ हजार ३०० रुपये किमतीचा जप्त करण्यात आला. या तिघांकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी हा दारूसाठा रहिमतपूर येथून आणल्याची कबुली दिली.या महितीच्या आधारे पोलिसांनी त्याच रात्री आठच सुमारास रहिमतपूर येथे सापळा लावला. टकले बोरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन व्यक्ती दारूची वाहतूक करत असताना पोलिसांना सापडले. त्यांच्या ताब्यातून ४३ हजार ८३६ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

या व्यक्तींनी बार मालक सचिन बेलागडे याच्याकडून दारूसाठा विकत घेतला असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांना बार मालकालाही अटक केली.पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तानाजी माने, प्रवीण शिंदे, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, नीलेश काटकर, संजय जाधव, विजय सावंत, गणेश कचरे यांनी ही कारवाई केली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याliquor banदारूबंदीSatara areaसातारा परिसर