शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: २५ मिनिटांत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त; कर्नल सोफिया कुरैशी यांनी सांगितला थरार
2
Operation Sindoor : पाकिस्तानमध्ये हल्ल्याच्या २३ मिनिटे आधीच लष्कराने ट्विट केले? समोर आली माहिती
3
‘ऑपरेशन सिंदूर’चे श्रेय तुम्ही घेऊ नका, ते फक्त भारतीय सेनेचेच; संजय राऊतांची सरकारवर टीका
4
Operation Sindoor: पाकिस्तान पिसाळला, शस्त्रसंधीचं उल्लंघन करत उखळी तोफा डागल्या, ७ भारतीयांचा मृत्यू
5
गृह मंत्रालय अलर्ट! निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारत-पाकमधील तणाव वाढला
6
पाकिस्तानी स्टॉक मार्केटचे काय हाल ऐकाल...; रात्री भारताची मिसाईल कोसळली, दिवसा भीतीने शेअर बाजार...
7
"आता ज्यांच्या पोटात दुखेल त्यांनी थेट माझा देश सोडून जावं", मराठी अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल
8
Operation Sindoor Live Updates: "यापुढेही भारतावर हल्ल्याची शक्यता, म्हणून उत्तर देणे गरजेचे होते"
9
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
10
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'च नव्हे, भारताने आधीही पाकिस्तानविरुद्ध केलेल्या 'या' मोठ्या कारवाया!
11
Operation Sindoor: 'सिंधू ते सिंदूर'पर्यंत...! भारताच्या 'या' १५ पावलांनी पाकिस्तानच्या नाकीनऊ आणले
12
FD/RD/PPF सगळं विसराल, SIP मध्ये लपलाय खरा खजिना; ₹५००० ची गुंतवणूक कशी बनवेल तुम्हाला कोट्यधीश
13
Vastu Shastra: हिरव्या रंगाचे पायपुसणे दारात ठेवा, यश, कीर्ती, भाग्योदयाचा ग्रीन सिग्नल मिळवा!
14
Operation Sindoor : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा रात्रीत खात्मा केला; पाकिस्तानमधील हल्ल्याचे फोटो आले समोर
15
“भारताने केलेली लष्करी कारवाई खेदजनक, दहशतवादाला विरोध पण...”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर चीनचे भाष्य
16
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
17
ज्येष्ठ रंगकर्मी माधव वझे यांचं निधन; 'श्यामची आई', '३ इडियट्स' सिनेमांमध्ये केलं होतं काम
18
Stock Market Today: आधी घसरण मग तेजी, Sensex १०० अंकांनी वधारला; ऑटो-बँकिंग स्टॉक्समध्ये मोठी खरेदी
19
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
20
"आम्ही मुस्लिमांना घर देत नाही", अली गोनी अन् जास्मीनला मुंबईत घर शोधताना आल्या अडचणी

CoronaVirus Lockdown : कारागृहातील आणखी एकाला कोरोना, जिल्ह्यात बाधितांची संख्या १२५ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 17:34 IST

सातारा जिल्ह्यात एक दिवसाआड कोरोनाचा रुग्ण आढळून येत असून, जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी आणखी एका बंदिवानाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कारागृहात दहाजण बाधित असून, संपूर्ण जिल्ह्याचा आकडा आता १२५ वर पोहोचला आहे. दरम्यान, ११५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर आठ संशयितांना नव्याने दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकारागृहातील आणखी एका बंदिवानाला कोरोना, जिल्ह्यात बाधितांची संख्या १२५ वर११५ जणांचा अहवाल निगेटिव्ह, आठ संशयित दाखल

सातारा : जिल्ह्यात एक दिवसाआड कोरोनाचा रुग्ण आढळून येत असून, जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी आणखी एका बंदिवानाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कारागृहात दहाजण बाधित असून, संपूर्ण जिल्ह्याचा आकडा आता १२५ वर पोहोचला आहे. दरम्यान, ११५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर आठ संशयितांना नव्याने दाखल करण्यात आले आहे.पुण्यावरून आलेल्या दोन बंदिवानांना सुरुवातीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये कोरोनाची साखळी वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत पडले आहे. शुक्रवारी कारागृहातील आणखी एका २६ वर्षीय बंदिवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनामध्ये खळबळ उडाली.

एकट्या कारागृहातील कोरोना बाधितांचा आकडा आता १० वर पोहोचला आहे. सातारा शहरामध्ये संशयित म्हणून नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. कारागृहातील बंदिवानांशिवाय यापूर्वी सातारा शहरात चार कोरोना बाधित सापडले आहेत.

या रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एकट्या सातारा शहरातील कोरोना बाधितांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. हा आकडा वाढू नये म्हणून प्रशासनाकडून आणखी खबरदारी घेण्यात येत आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तत्काळ क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. तसेच संबंधित परिसरही सील करण्यात येत आहे.दरम्यान, कऱ्हाड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ९९, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील २, व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील १४ अशा एकूण ११५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालयात आठजणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १२५ झाली असून, यापैकी कोरोनामुक्त होऊन ४५ जण घरी गेले आहेत. तर दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७८ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर