शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

corona virus : कोरोना बाधितांचा आकडा साडेतीन हजार पार, नवे १८६ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 17:39 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी नव्याने १८६ रुग्ण आढळले. आतापर्यंतचा हा एका दिवसांतील सर्वाधिक आकडा ठरला असून, बाधितांचा आकडा ३,५२४ वर पोहोचला.

ठळक मुद्दे कोरोना बाधितांचा आकडा साडेतीन हजार पार, नवे १८६ रुग्ण कहर थांबेना; ५ जणांचा मृत्यू, ६७ जणांना सोडले घरी

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवारी नव्याने १८६ रुग्ण आढळले. आतापर्यंतचा हा एका दिवसांतील सर्वाधिक आकडा ठरला असून, बाधितांचा आकडा ३,५२४ वर पोहोचला. तर मंगळवारी आणखी ५ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ११९ वर गेली आहे. दरम्यान, कोरोनावर मात करणाऱ्या ६७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता १८६५ झाली आहे.जिल्ह्यात मार्च महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित स्वरुपात होती. पण, जून महिन्याच्या उत्तरार्धापासून कोरोनाचा कहर झाला. त्यामुळे दिवसेंदिवस मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येऊ लागले. जिल्ह्यात सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार १३५ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार कोरोना बाधित १३५ रुग्ण तालुकानिहाय असे आहेत. सातारा तालुक्यात सर्वाधिक २४ रुग्ण निष्पन्न झाले. यामध्ये सातारा शहरातील सदर बझारमध्ये १३, प्रतापगंज पेठ १, बुधवार पेठ २, करंजे खैरमली १ असे हे रुग्ण आहेत. तर तालुक्यात वर्ये येथे १, सैदापूर आणि पाटखळला प्रत्येकी १ आणि कण्हेरला २ रुग्ण आढळले. तसेच खटाव तालुक्यातही नवीन २३ रुग्ण स्पष्ट झाले. यामध्ये वडूज शहरात १३, विसापूर ७ आणि बनपुरी, पाचवड व निढळला प्रत्येकी १ रुग्ण बाधित सापडला.कºहाड तालुक्यातही नव्याने २१ कोरोना रुग्णांची नोंद झाली. यामध्ये कऱ्हाड शहरातील रविवार पेठेत १, मंगळवार पेठ १, शनिवार पेठेत २ तसेच शहरातील इतर दोघांचा यामध्ये समावेश आहे. तर आगाशिवनगरला २, मलकापूर ५, कालवडे येथे २, वडगाव हवेलीला १, येळगावमध्ये २ आणि कोर्टी व शिवडे येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला. खंडाळा तालुक्यातही नवीन २१ रुग्ण आढळले. यामध्ये जवळे ४, पाडेगाव ४, विंग ८. तर शिरवळमधील बालाजी विश्व आणि स्टार सिटीमध्ये प्रत्येकी १ तसेच पळशी, खंडाळा आणि लोणंदमध्येही प्रत्येकी १ रुग्ण निष्पन्न झाला.पाटण तालुक्यात कासरुंडला ३, निगडे ३, जाधववाडी चाफळ २, चाफळ ३, नेरले ७, मल्हारपेठ आणि खाले प्रत्येकी १ अशाप्रकारे २० रुग्ण नव्याने स्पष्ट झाले. त्याचबरोबर वाई तालुक्यात १५ रुग्ण आढळले. यामध्ये पसरणी ४, काझी कॉलनी वाई २, वाई १, बोरगाव १, रेणावळे १, सिद्धांतवाडी १, माऊलीनगर १ तसेच सोनगिरवाडी १, रविवार पेठ, फुलेनगर आणि शहाबागमध्येही प्रत्येकी १ रुग्ण आढळला.

जावळी तालुक्यात सायगाव येथे ४ आणि पुनवडीला १ असे नवे ५ रुग्ण निष्पन्न झाले. महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर शहरात आणि गोडवली पाचगणी येथे प्रत्येकी १ असे ऐकूण २ रुग्ण वाढले. फलटण तालुक्यातही कोळकी आणि राजाळेत प्रत्येकी १ रुग्ण आढळला. तर कोरेगाव तालुक्यात सासुरणे येथील एकजण कोरोना बाधित निघाला.कोरेगाव, खंडाळा, वाई, साताऱ्यातील मृत...कोरोना बाधित आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरेगाव तालुक्यातील कुमठे येथील ७६ वर्षीय पुरुष आणि लोणंद, ता. खंडाळा येथील ६५ वर्षांच्या महिलेचा समावेश आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातच वाई तालुक्यातील परखंदीचा ७२ वर्षांचा पुरुष आणि कुस बुद्रुक, ता. सातारा येथील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

सातारा तालुक्यातील सोनगाव (क्षेत्रमाहुली) येथील ६२ वर्षांच्या वृद्धेचाही साताऱ्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. खासगी प्रयोगशाळेत या वृद्धेचा अहवाल कोरोना बाधित म्हणून आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर