शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : जिल्ह्यात नवे २८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:21 IST

सातारा जिल्ह्यात शनिवारी नवे २८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, बाधितांचा आकडा आता ९१९ वर पोहोचला आहे. दरम्यान, १८५ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात नवे २८ कोरोना पॉझिटिव्हबाधितांचा आकडा ९१९ वर; १८५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यात शनिवारी नवे २८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, बाधितांचा आकडा आता ९१९ वर पोहोचला आहे. दरम्यान, १८५ जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत.जिल्ह्यातील आठ तालुक्यांत शनिवारी बाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये सातारा, वाई, खटाव, खंडाळा, पाटण, कºहाड, कोरेगाव आणि जावळी तालुक्यांील रुग्णांचा समावेश आहे. या कोरोना बाधित २८ रुग्णांमध्ये २१ पुरुष तसेच ७ महिलांचा समावेश आहे. यात मुंबई, ठाणे येथून प्रवास करून आलेले ६ प्रवासी आणि १८ निकटसहवासित आणि ४ सारीचे रुग्ण आहेत.सातारा तालुक्यातील धावली (रोहोट) येथील ४५ वर्षीय महिला, राजापुरामधील ३९ वर्षीय पुरुष आणि आसवलीतील २७ वर्षीय युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. तसेच वाई तालुक्यात चारजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामध्ये कडेगावमधील ३४ वर्षीय पुरुष, पसरणीतील ४८ वर्षीय पुरुष, अमृतवाडीमधील ५० वर्षीय पुरुष आणि बावधन येथील ५७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

खटाव तालुक्यातील मायणी येथील २९ वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाली. त्याचबरोबर खंडाळा तालुक्यातील शिंदे वस्ती (लोणंद) येथील ३८ वर्षीय महिला आणि आसवलीतील २७ वर्षीय युवक कोरोना बाधित आढळून आला. जावळी तालुक्यातील रामवाडीमधील ६५ वर्षीय पुरुष तसेच ६० वर्षीय महिला आणि आखेगनी (रांजणी) येथील ४२ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित आला. तसेच कोरेगाव तालुक्यातील नागझरी येथील २६ वर्षीय युवकालाही कोरोना झाला.

कऱ्हाड तालुक्यामध्ये सर्वाधिक १३ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये तारूखमधील २१ आणि २२ वर्षीय युवक तसेच २७, २८ व ४८ वर्षीय पुरुष, ४५ व ५० वर्षीय महिला, चरेगावमधील ४ वर्षीय बालक, तसेच ३८ आणि ३६ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, बनवडीतील २९ वर्षीय पुरुष, कऱ्हाड शहरातील शनिवार पेठेतील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच पाटण तालुक्यातील उरूलमधील ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली.जिल्ह्यात आत्तापर्यंत ९१९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ६९९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसेच ४२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या १८३ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर