शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवे २२८ रुग्ण, बळी १३०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 18:39 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, आजवरचा एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण २२८ रुग्ण शुक्रवारी आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ४,०५३ वर पोहोचला आहे.

ठळक मुद्दे जिल्ह्यात कोरोनाचे नवे २२८ रुग्ण, बळी १३०बाधित ४०५३, मुक्त २०३६; चार हजारांचा टप्पा पूर्ण

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच असून, आजवरचा एका दिवसातील सर्वाधिक रुग्ण २२८ रुग्ण शुक्रवारी आढळून आले. यामुळे बाधितांचा आकडा ४,०५३ वर पोहोचला आहे.दरम्यान, दिवसभरात ५४ जणांना घरी सोडण्यात आले असून, कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आता २०३६ झाली आहे. तसेच ५५५ जणांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.जिल्ह्यात गुरुवारी रात्री १६३ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले.

यामध्ये विशेष म्हणजे जिल्'ातील सर्व अकरा तालुक्यांत बाधित रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना बाधित रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.पाटण तालुक्यात ४ रुग्ण आढळून आले. यामध्ये त्रिपोडी १, शिंदेवाडी १, मल्हारपेठ १ तर नेरले येथील एकाचा समावेश आहे.वाई तालुक्यात ९ बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये बोरगाव १, पसरणी २, यशवंतनगर १, बोपेगाव १, परखंदी १, वाई १, मुंगसेवाडी १ तर धनगरवाडी येथील एकाचा समावेश आहे.कºहाड तालुक्यात सर्वाधिक ५० रुग्ण आढळून आले. यामध्ये शामगाव ३, कालवडे ४, शनिवार पेठ २, घरलवाडी १, वडगाव ५, शिवडे २, कऱ्हाड १, उंब्रज २, शनिवार पेठ ५, आगाशिवनगर ७, गजानन हौसिंग सोसायटी १, गुरुवार पेठ १, कृष्णा हॉस्पिटल १, कोयना वसाहत ८, मलकापूर १, मंगळवार पेठ १, रविवार पेठ १, रेठरे बुद्रुक १ तर सह्याद्री हॉस्पिटल येथील तिघांचा समावेश आहे.खंडाळा तालुक्यात १३ रुग्ण आढळून आले. यामध्ये बावडा २, पंढरपूर फाटा २, विंग २, खंडाळा ३, पाडेगाव १, राजेवाडी १, मंडई कॉलनी शिरवळ १ तर मोरवे येथील एकाचा समावेश आहे.सातारा शहर आणि तालुक्यात १५ रुग्ण आढळून आले.

साताऱ्यातील भवानी पेठ २, गडकर आळी ५, नागठाणे १, यादोगोपाळ पेठ १, अतीत १, औंध १, गोडोली १, शिवथर १, शाहूपुरी १ तर सदर बझार येथील एकाचा समावेश आहे. माण तालुक्यात दहिवडी येथील ३ तर शिंगणापूर येथील एकाचा बाधितांमध्ये समावेश आहे.कोरेगाव तालुक्यात १२ रुग्ण आढळून आले. यामध्ये वाठार स्टेशन १, पिंपोडे २, वाघोली ४, वाठार किरोली १, कोरेगाव २, रहिमतपूर १ तर कुमठे येथील एकाचा समावेश आहे. खटाव तालुक्यात ४ रुग्ण आढळून आले. यामध्ये खटाव १, वडूज २ तर मायणी येथील दोघांचा समावेश आहे.फलटण तालुक्यात १७ रुग्ण आढळून आले. यामध्ये जिंती नाका ३, लक्ष्मीनगर १, मुंजवडी ८, रविवार पेठ १, सासवड २, पाडेगाव १ तर उपळे येथील एकाचा समावेश आहे. महाबळेश्वर तालुक्यात १९ रुग्ण आढळून आले.

रांजणवाडी ११, गोडवली ३, मल्होत्रा भवन भोसे खिंड २ तर पाचगणी येथील तिघांचा समावेश आहे. जावळी तालुक्यातील दुदुस्करवाडी या एकट्या गावामध्ये १७ रुग्ण आढळून आले तर सायगाव येथे एक रुग्ण बाधित आढळून आला.खासगी प्रयोगशाळेचे २५ अहवाल...कोरोना बाधितांमध्ये सातारा तालुका- १६ (सातारा शहर ७), जावळी तालुका-२, वाई तालुका-१, माण तालुका-१, पाटण तालुका-१, खटाव तालुका-१, खंडाळा तालुका-१, इचलकरंजी (कोल्हापूर)-१, कडेगाव सांगली येथील एकाचा समावेश आहे.कोरोनामुक्तीचा आकडा दोन हजार पारजिल्ह्यात आतापर्यंत ४०५३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी २०३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १३० जणांचा मृत्यू झाला. सध्या १८८६ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर