अर्धा तास थांबून राहणे गरजेचे; न घाबरता लसीकरण करून घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना लसीकरणानंतर अनेकजण तातडीने केंद्राबाहेर पडतात. पण असे करणे धोक्याचे असते. लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास तरी केंद्रावर थांबणे आवश्यक आहे. अन्यथा थंडी वाजून येणे, ताप वाढणे असा त्रास होऊ शकतो. केंद्रावर त्रास होत असलेल्या लोकांवर तत्काळ उपचार केले जातात, परंतु न थांबता गेलेल्या व्यक्तीला घाई महागात पडू शकते.
लसीकरण केल्यानंतर अनेक जण घरी जाण्याची घाई करतात. लसीकरण केंद्रावर लसीकरण कक्ष आणि त्यानंतर विश्रांतीसाठी वेगळा कक्ष दिलेला असतो. या ठिकाणी बैठकीची व्यवस्था देखील केलेली असते. तसेच तज्ञ डॉक्टर या ठिकाणी उपस्थित असतात. लस घेतल्यानंतर नागरिकांना काही त्रास होतोय का, याबाबतचे निरीक्षण देखील ते नोंदवत असतात. त्रास झालाच तर त्यांच्यावर उपचार करणे सोपे जाते. लस घेतल्यानंतर ताप येणे, अंगदुखी असे प्रकार होतात. मात्र लोकांनी घाबरून न जाता लस घेतल्यानंतर किमान अर्धा तास लसीकरण केंद्रावर थांबून राहावे. तसेच लसीकरण केंद्रावर ज्या सूचना केल्या जातात, त्यानुसार औषध घेणे आवश्यक आहे. केंद्रावर दिलेल्या सुचणे व्यतिरिक्त उपचार करण्याची प्रकार देखील महागात पडू शकतो, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे.
असा मथळा आपल्याला करता येईल.
या बातमीत खालील मुद्दे अपेक्षित आहेत.
१) पॉईंटर्स
आतापर्यंत झालेले लसीकरण
एकूण लसीकरण -
पहिला डोस -
दुसरा डोस -
एकूण लसीकरण केंद्र - ४४६
३० ते ४० वयोगटासाठी केंद्र - ५६
२) लसीकरणानंतर अर्धा तास कशासाठी? (बॉक्स. लसीकरणानंतर अर्धा तास केंद्रावरच थांबवायचे असते. लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीला काही त्रास होत असेल तर केंद्रावर उपस्थित असलेले आरोग्य कर्मचारी त्यांच्यावर तत्काळ उपचार करू शकतात म्हणून लसीकरण केंद्रावर अर्धा तास थांबणे आवश्यक आहे.
३) लस हेच औषध (बॉक्स.
लसीकरणानंतर त्रास झाल्याच्या काही तक्रारी असल्या तरी कोरोनावर लस हेच औषध आहे. लसीकरण केलेल्या व्यक्तीला जरी कोरोनाची बाधा झाली तरीदेखील आजाराची तीव्रता कमी राहते. लस एक प्रकारे रुग्णाला संजीवनी देणारी ठरते. लस घेतलेली व्यक्ती या आजारातून लवकरात लवकर बरे होत आहेत.
४) दोन कॉलम फोटो (लसीकरण केंद्रावरील फोटो)
कोट..
लोकांमध्ये सुरुवातीच्या काळात गैरसमज असल्यामुळे लसीकरणाला जायचे टाळले जात होते. आता मात्र लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. लोकांनी घाबरता लसीकरण करून घ्यावे.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये
जिल्हा आरोग्य अधिकारी
फोटो जावेद खान