शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

corona in satara- जवानासह एकाला मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 19:39 IST

सुटीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाला आणि एका सर्वसामान्य व्यक्तीला मारहाण करणाऱ्या पोलिसांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देजवानासह एकाला मारहाण करणाऱ्या पोलिसांची चौकशीपोलीस अधीक्षकांचे आदेश : चौकशीअंती दोषींवर कारवाई होणार

सातारा : सुटीवर आलेल्या सैन्य दलातील जवानाला आणि एका सर्वसामान्य व्यक्तीला मारहाण करणाऱ्या पोलिसांची खातेअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.माण तालुक्यातील पळसावडे येथील जवान दत्ता शेंडगे हे दोन दिवसांपूर्वी सुटीसाठी गावी आले आहेत. शेंडगे हे त्यांच्या अंगणामध्ये एका व्यक्तीशी बोलत असताना म्हसवड पोलिसांनी जवानावर लाठी हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.

या प्रकारानंतर जवान दत्ता शेंडगे यांनी सोशल मीडियावर घडलेला प्रसंग कथन केला. पोलिसांकडून विनाकारण मारहाण झाल्याचा आरोप शेंडगे यांनी केला होता. मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणीही शेंडगे यांनी केली होती.दरम्यान, दुसरी घटना साताऱ्यातील राधिका रस्त्यावर बुधवारी दुपारी घडली. एक व्यक्ती एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी चालत जात असताना पोलिसांनी त्याला काठीने बेदम मारहाण केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीनेही पोलिसांना मारहाण केली.

या घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीने सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी तत्काळ संबंधित पोलिसांची पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीअंती दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसSatara areaसातारा परिसर