शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

corona in satara : कऱ्हाडमध्ये आणखी एक कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 17:13 IST

दोन दिवसांच्या दिलाशानंतर कऱ्हाडमध्ये आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला असून, एकट्या कऱ्हाडमध्ये ३९ रुग्ण बाधित आहेत. तर संपूर्ण जिल्ह्याचा आकडा आता १२९ वर पोहोचला आहे. दरम्यान, ७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच १०४ जणांना नव्याने संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकऱ्हाडमध्ये आणखी एक कोरोना बाधितजिल्ह्यात रुग्णांची संख्या १२९ वर; ७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह

सातारा: दोन दिवसांच्या दिलाशानंतर कऱ्हाडमध्ये आणखी एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आला असून, एकट्या कऱ्हाडमध्ये ३९ रुग्ण बाधित आहेत. तर संपूर्ण जिल्ह्याचा आकडा आता १२९ वर पोहोचला आहे. दरम्यान, ७४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तसेच १०४ जणांना नव्याने संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे.कऱ्हाडमध्ये गत दोन दिवसांपासून एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नव्हता. याउलट बरे होऊन रुग्ण घरी जात होते. त्यामुळे प्रशासनाबरोबरच कऱ्हाडकरांनाही मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, शनिवारी सकाळी आणखी एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची धडधड वाढली.

पुणे येथून प्रवास करून आलेला युवक कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर कऱ्हाड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.जिल्हा शासकीय रुग्णालय २९, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कºहाड येथील २४, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील २ व ग्रामीण रुग्णालय वाई येथील ९ तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कऱ्हाड येथील १० अशा एकूण ७४ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

जिल्हा शासकीय रुग्णालय ४०, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथे ६४ अशा एकूण १०४ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १२९ झाली असून यापैकी कोरोना मुक्त होऊन ६१ जण घरी गेले तर दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. सध्या ६६ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर