शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

corona in satara : कोरोना बाधितांचा आकडा शतकाकडे, रुग्ण संख्या ९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 14:44 IST

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली असून गुरूवारी सकाळी आणखी नव्या तीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा ९५ वर गेला आहे. या नवीन रुग्णात साताऱ्यातील एकाचा तर कऱ्हाडमधील दोघांचा समावेश असून हे सर्वजण निकट सहवासित आहेत. तर नव्याने १३० संशयितांना दाखल झाले आहे.

ठळक मुद्देकोरोना बाधितांचा आकडा शतकाकडे, रुग्ण संख्या ९५साताऱ्यात एक अन् कऱ्हाडमध्ये दोघेजण वाढले, संशयित १३० दाखल

सातारा : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली असून गुरूवारी सकाळी आणखी नव्या तीन रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्याचा आकडा ९५ वर गेला आहे. या नवीन रुग्णात साताऱ्यातील एकाचा तर कऱ्हाडमधील दोघांचा समावेश असून हे सर्वजण निकट सहवासित आहेत. तर नव्याने १३० संशयितांना दाखल झाले आहे.जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढू लागला आहे. यामध्ये दररोज नवीन रुग्णांची भर पडत चालली आहे. बुधवारी नवे १२ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील १० जणांचा समावेश होता. असे असतानाच आता गुरूवारी आणखी जिल्ह्यातील तिघांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. यामधील दोघे रुग्ण हे कऱ्हाड  तालुक्यातील आहेत. तर एकजण सातारा शहरातील आहे.कऱ्हाडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल असणारी २ वर्षीय मुलगी व ६८ वर्षांच्या वृध्दाला कोरोना झाल्याचे अहवालावरुन समोर आले आहे. तसेच साताºयातील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल ७० वर्षीय वृध्दाही कोरोना बाधित आहे. ही वृध्दा सातारा शहरातील आहे. हे तिघेही कोरोना रुग्णांच्या निकट सहवासित आहेत.दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात ७, वेणूताई चव्हाण उपजिल्हायात १०२, फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये २१ अशाप्रकारे एकूण १३० जणांना कोरोनाच्या संशयावरुन विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.चौकट :२३ जणांचा अहवाल निगेटिव्ह...जिल्ह्यात विविध ठिकाणी दाखल असणाºया २३ जणांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. यामध्ये दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयातील एक, कºहाडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ११, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय १ व फलटण उपजिल्हा रुग्णालयातील १० जणांचा समावेश आहे...................................

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर