शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे तमाशा कलावंतावर खेळणी विकण्याची वेळ!, सलग तीन वर्षे उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 13:38 IST

तमाशा कलावंताच्या कुटुंबांची रस्त्यावर उतरून रोजगार मिळवण्यासाठी धरपड

संजय कदमवाठार स्टेशन : सलग तीन वर्षे कोरोना महामारीने अनेकांचं जगणं मुश्कील केले आहे. कोरोनाचा फटका तमाशा कलावंत व जागरण पार्टी मालकानाही बसला आहे. भाडळेतील दिवंगत बाळासाहेब भाडळेकर याचं कुटुंबियांनी तमाशासाठी २५ लाखांचं कर्ज उरावर असताना जीव जगवण्यासाठी या तमाशा कलावंताचे कुटुंब रस्त्यावर उतरून रोजगार मिळवण्यासाठी धरपडत आहे. वाठार स्टेशनमध्ये या कुटुंबातील लोक मासे विक्री, लहान मुलांची खेळणी विकून रोजगाराच्या वाटा शोधत आहेत. कोरोनाने अनेकांचे रोजगार हिरावले तर अनेक व्यवसाय बंद झाले. गर्दी करणारे सर्वच व्यवसाय बंद झाले. महाराष्ट्राची लोककला जोपासणारी तमाशा कला ही या तीन वर्षांत लोप पावते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. वर्षातील मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत गावोगावी यात्रेत मागणी असणारे तमाशे तीन वर्षात दिसले नाहीत. 

या कलाकारांनी कोरोना काळात नक्की केलं तरी काय? शासनाने त्यांना काय दिले की केवळ लोककला म्हणून मान दिला. वाठार स्टेशनसारख्या गावात ही लोककला जोपासणारी कलावंत मंडळी मिळेल ते काम करून पैसे मिळवत घर प्रपंच चालवत आहेत. शासनाने अशा लोककलावंतांना मदत करणं गरजेच आहे. तरच ही लोककला जिवंत राहील अशी परिस्थिती आहे. 

गेली चार पिढ्या आम्ही लोकांना हसवण्याचं त्याचं मनोरंजन करण्याचं काम करीत आहे. लोककला जोपासताना कलाकारांना सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या गेली तीन वर्षे ही कला बंद आहे. पण यासाठी काढलेल्या कर्जाचं काय ते कसं फेडायचं हा प्रश्न आहे. सरकारन यासाठी मदत करावी. - विशाल भाडळेकर, तमाशा मालक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या