शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 22:17 IST

जिल्ह्यात २०२० मध्ये कोरोनाचा प्रथम शिरकाव झाला. त्यानंतर दोन वर्षे कोरोनाने दोन लाखांहून अधिकजण बाधित झाले होते. तसेच अनेकांचा मृत्यूही झालेला.

नितीन काळेल 

सातारा : जिल्ह्यात अडीच वर्षानंतर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरूवारी दोन रुग्ण निष्पन्न झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि कऱ्हाडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर यातील एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.

जिल्ह्यात २०२० मध्ये कोरोनाचा प्रथम शिरकाव झाला. त्यानंतर दोन वर्षे कोरोनाने दोन लाखांहून अधिकजण बाधित झाले होते. तसेच अनेकांचा मृत्यूही झालेला. मात्र, २०२२ च्या उत्तरार्धापासून कोरोना रुग्ण सापडणे थांबले होते. पण, अडीच वर्षानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. सध्या दोन रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

एकावर सातारा येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या व्यक्तीवर कऱ्हाडमधील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात एक स्वतंत्र वाॅर्ड तयार करण्यात आलेला आहे.