शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

जिल्हा बँकेच्या पटावर सोयीच्या चाली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करून भाजपला रोखण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखली होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करून भाजपला रोखण्याची व्यूहरचना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखली होती. मात्र आता ती धूसर दिसू लागली आहे. तहाच्या बोलण्यात सत्ता गमवायची भीती राष्ट्रवादीला सतावत असून, पूर्वी जे बरोबर होते, त्यांना सोबत घेऊन ‘जैसा पहले था..वैसाही चलने दें’ अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतलेली आहे.

जिल्हा बँकेचे राजकारण दिवसागणिक कूस बदलताना दिसत आहे. खासदार उदयनराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले, आमदार जयकुमार गोरे, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या ताकदीच्या जोरावर जिल्हा बँकेत एन्ट्री करण्यासाठी भाजप इच्छुक आहे. राष्ट्रवादीने मात्र शिवेंद्रसिंहराजेंसारख्या तगड्या पैलवानालाच सोबत घेऊन भाजपची हवा काढली आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक इतर निवडणुकांसारखी सार्वत्रिक नसते. तसेच मतदारसंख्यादेखील मोजकी असते. भाजपने राज्याची सत्ता मिळवली होती, तरीदेखील विकास सेवा सोसायट्या, सहकारी बँका, खरेदी-विक्री संघ, बाजार समित्या, सहकारी साखर कारखाने, मजूर सोसायट्या, गृहनिर्माण सोसायट्या, कृषी उत्पादन प्रक्रिया संघ यांच्यावर राष्ट्रवादीची कमांड आहे. सत्ता नव्हती, तेव्हादेखील जिल्ह्याच्या या संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या आणि आता तर सत्ता आल्यापासून पुन्हा राष्ट्रवादीचे बळ वाढलेलेे आहे. नेमक्या याच संस्थांतील प्रतिनिधी जिल्हा बँकेला मतदान करणार असल्याने भाजपपुढे यक्षप्रश्न आहे.

आता बँकेच्या निवडणुकीसाठी सर्वपक्षीय गुऱ्हाळ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुरू केले आहे. आता हे गुऱ्हाळदेखील काही दिवसांनी मागे पडून सोयीच्या चाली खेळून जिल्हा बँकेवर ताबा मिळविण्यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करणार, हे वेगळे सांगायची गरज नाही.

चौकट..

जयकुमार गोरेंना एकाकी पाडण्याची खेळी

आमदार जयकुमार गोरे हे मोठ्या संघर्षाने जिल्हा बँकेत निवडून आले होते. तसेच राष्ट्रवादीच्या बँकेतील कारभारावर त्यांनी चेक ठेवण्याचे काम केले होते. बँकेच्या सत्ताधाऱ्यांवर जोरदार आरोप ठेवत ते बँकेसमोर उपोषणालादेखील बसले होते, त्याची राज्यभर चर्चा झाली. आता जयकुमार गोरे यांना एकाकी पाडण्याची खेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खेळली आहे.

चौकट..

उदयनराजे-शंभूराजेंच्या मैत्रीचा कस

खासदार उदयनराजे भोसले आणि राज्यमंत्री शंभूराज देसाई हे वारंवार आपल्या मैत्रीचे दाखले देत असतात. मंत्री झाल्यानंतर शंभूराज उदयनराजेंना भेटायला जलमंदिरवर गेले होते. तेव्हादेखील पक्ष, आघाडीपेक्षाही मैत्री श्रेष्ठ असे दोघांनी दाखवून दिले. आता जिल्हा बँकेची निवडणूक रंगात आली असताना, उदयनराजे शंभूराज देसाईंना भेटले. मराठा आरक्षण प्रश्नावर या दोघांनी चर्चा केली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निवडणुकीत हे दोघेही एकमेकांना मदत करतील. हे दोन्ही नेते बँकेत संचालक होण्यासाठी पूरक चाली खेळू शकतात.

चौकट..

शिवेंद्रराजे-शशिकांत शिंदेंचे एक पाऊल मागे

भारतीय जनता पक्षाने ग्रामपंचायत निवडणुकीची मोहीम संपताच जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर फोकस केलाय. ही मोहीम फत्ते करण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांनी सैन्य पुढे घ्यायला सुरुवात केली असतानाच, त्यांच्या हाती असलेल्या वजिराची त्यांना साथ मिळण्याची शक्यता धूसर झालेली आहे. काही दिवसांपूर्वी एकमेकांवर टीका करणारे शिवेंद्रसिंहराजे व शशिकांत शिंदे हे दोन नेते पुन्हा गळ्यात गळे घालू लागल्याने जिल्हा बँकेत दोघांचेही ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

चौकट..

उदयसिंहांचा एकमेव हात काँग्रेसच्या पाठीशी

जिल्हा मध्यवर्ती बँकेत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविण्याची भाषा राष्ट्रवादीचे नेते करत होते. आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील भाजपचे मोठे आव्हान डोळ्यापुढे दिसत असताना राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्याचे संकेत दिले होते. यामुळे काँग्रेसला एक अधिकची जागा बँकेत मिळेल, अशी आशा लागून राहिली होती. मात्र आपली ताकद बघता उदयसिंह पाटील यांना मिळालेल्या संधीवरच काँग्रेस समाधान मानणार असल्याचे चित्र सध्या आहे. कऱ्हाड तालुक्याच्या सोसायटी मतदारसंघातून केवळ एकच प्रतिनिधी जिल्हा बँकेवर घेतला जातो. इथून मंत्री बाळासाहेब पाटील हे देखील आग्रही राहणार असल्याने उदयसिंहांच्या रस्त्यातही अडचणी आहेत.

चौकट..

पाटणकर की देसाई- आघाडीपुढील पेच

पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पाटणकर-देसाई यांच्या गटातील पारंपरिक संघर्ष राज्यात झालेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या आघाडीमुळे कमी झालेला दिसतो. मात्र आता जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हा संघर्ष पुन्हा निर्माण होऊ शकतो. विधानसभा निवडणुकीत सलग दोन निवडणुका जिंकून राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळविल्याने शंभूराज देसाई यांचे पारडे जड झालेले आहे. आता जिल्हा बँकेला पाटण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून प्रतिनिधीत्व करत असलेल्या विक्रमसिंह पाटणकर यांना किंवा त्यांचे पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांना राष्ट्रवादी पुन्हा संधी देऊ शकते. या परिस्थितीत मंत्री देसाई यांनाही संघर्ष अटळ आहे.