शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ‘कोयने’ला सर्वाधिक पावसाची नोंद; धरणात किती टीएमसी पाणीसाठा.. वाचा सविस्तर

By नितीन काळेल | Updated: June 17, 2025 19:31 IST

साताऱ्यात ऊन अन् पावसाचा खेळ 

नितीन काळेलसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार असून मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला सर्वाधिक १३७ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे धरणात सुमारे ३० हजार क्युसेक वेगाने पाणी आवक होत आहे. परिणामी धरणातील पाणीसाठा २५ ‘टीएमसी’च्या वर गेला आहे. तर सातारा शहरात सकाळपासून ऊन-पावसाचा खेळ सुरू होता.जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. मागील चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढत चालला आहे. विशेष करून पश्चिम भागात पावसाची संततधार आहे. कास, बामणोली, तापोळा, कोयना, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात पाऊस पडत आहे. यामुळे रानमाळावरून पाणी खळाळू लागले आहे. तसेच ओढे आणि नालेही भरून वाहू लागलेत. भात खाचरात पाणी साचले आहे. तर या पावसामुळे भात लागणीलाही वेग येणार आहे.पाटण तालुक्यातही पाऊस वाढला आहे. मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगरला १३७ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे १२५ आणि महाबळेश्वरलाही १२८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम भागातील या पावसामुळे प्रमुख धरणात पाण्याची आवक वाढू लागली आहे. त्यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक अधिक होऊ लागली आहे.मंगळवारी सकाळच्या सुमारास २९ हजार ८८५ क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणात २५.१२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. टक्केवारीत हे प्रमाण २३.८७ इतके आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत कोयनानगरला ३८८, नवजा येथे ३६६ आणि महाबळेश्वरला ३२४ मिलिमीटर पर्जन्यमान झालेले आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहिले आहे.