शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

व्यायामासाठी गेलेल्या तिघांना कंटेनरने चिरडले, जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 17:52 IST

कऱ्हाड -तासगाव मार्गावर पहाटे व्यायामाला गेलेल्या तिघांना भरधाव कंटेनरने चिरडले. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा गावच्या हद्दीत पोल्ट्रीजवळ पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघातानंतर चालक कंटेनरसह पसार झाला आहे.

ठळक मुद्देव्यायामासाठी गेलेल्या तिघांना कंटेनरने चिरडले, जागीच मृत्यू कऱ्हाड -तासगाव मार्गावर दुर्घटना; मृत शेणोलीचे

कऱ्हाड : कऱ्हाड -तासगाव मार्गावर पहाटे व्यायामाला गेलेल्या तिघांना भरधाव कंटेनरने चिरडले. किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा गावच्या हद्दीत पोल्ट्रीजवळ पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली. अपघातानंतर चालक कंटेनरसह पसार झाला आहे.दीपक ज्ञानू गायकवाड (वय ४५), प्रवीण हिंदुराव गायकवाड (४०) व विशाल धोंडिराम गायकवाड (३०, तिघेही रा. सम्राटनगर, शेणोली, ता. कऱ्हाड ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेनंतर शेणोली गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कऱ्हाड ते तासगाव जाणाऱ्या मार्गाचे सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. त्यातच या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. दुधारी, ताकारीसह तासगावकडे जाणारी अवजड वाहने याच मार्गावरून जातात.

या मार्गानजीक असलेल्या शेणोली गावातील अनेक ग्रामस्थ पहाटे तासगाव मार्गावरून किल्ले मच्छिंद्रगडकडे चालत व्यायामासाठी जातात. सोमवारी सकाळी गावातील दीपक गायकवाड, प्रवीण गायकवाड, विशाल गायकवाड, रोहित गायकवाड हे चौघेजण व्यायामासाठी गेले होते. त्यापैकी दीपक, प्रवीण व विशाल तिघेजण रस्त्यानजीक बसून व्यायाम करीत होते. त्यावेळी कऱ्हाडहून ताकारीकडे भरधाव निघालेल्या कंटेनरने त्या तिघांना चिरडले. तर रोहित गायकवाड हे काही अंतरावर असल्यामुळे ते बचावले.अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, ग्रामस्थ पोहोचेपर्यंत चालक कंटेनरसह पसार झाला. अपघाताची माहिती मिळताच कऱ्हाड ग्रामीण तसेच वाळवा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी अपघातस्थळाचा पंचनामा केला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. पंचनामा झाल्यानंतर पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर