शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण का केली? आमदार संजय गायकवाड म्हणाले, 'वरण खराब निघाल्याने..."
3
"लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा"; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या
4
मुंबई: आईला म्हणाला, 'लवकरच जेवायला घरी येतो' अन् ओंकारने अटल सेतूवरून मारली उडी; ३६ तासानंतरही शोध सुरूच
5
Video: स्टंपचे दोन तुकडे... Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने केला भन्नाट कारनामा
6
जमीन खणताच नशीब फळफळलं, मजुराच्या हाती लागली मौल्यवान वस्तू, काही तासांतच झाला लखपती    
7
Ahmedabad Plane Crash : विमान अपघातातील 'त्या' १९ लोकांवर गुजरात सरकारने केले अंत्यसंस्कार; पण कारण काय?
8
तुमचं जनधन खातं बंद होणार? खातेधारकांमध्ये गोंधळ, सरकारनं दिलं स्पष्टीकरण
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
10
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
11
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
12
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
13
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
14
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
15
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
16
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
17
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
18
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
19
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
20
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही

मदन भोसले कमळाच्या संपर्कात !

By admin | Updated: August 3, 2014 22:45 IST

गोविंद केंद्रे : पाच मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी

सातारा : वाई विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते मदन भोसले भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट पक्षनिरीक्षक गोविंद केंद्रे यांनी केल्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडलेले माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनीही माणमधून उमेदवारी मिळावी म्हणून वरिष्ठांशी हॉटलाइनवर संपर्कात असल्याचा दावा केंद्रे यांनी केला आहे.भाजपच्या शहर कार्यालयात पक्षनिरीक्षक तथा माजी आमदार गोविंद केंद्रे आणि सुनील बडे यांनी विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचित केली. यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, शहराध्यक्षा सुवर्णा पाटील, जिल्हा सरचिटणीस दत्ताजी थोरात, विष्णू पाटस्कर त्याचबरोबर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, भाजपच्या शहर कार्यालयात झालेल्या चर्चेदरम्यान, जिल्ह्यातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली. ग्रामीण भागात काम करत असताना येणाऱ्या अडचणी, समस्या यावरही अनेकांनी भाष्य केले.माजी आमदार केंद्रे म्हणाले, ‘जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांचा आढावा आम्ही घेतला असून, इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या. त्यामुळे सातारा, कऱ्हाड दक्षिण, माण, कोरेगाव आणि वाई हे मतदारसंघ भाजपला सोडण्याची मागणी कोअर कमिटीकडे करणार आहे. माजी आमदार मदन भोसले भाजपच्या संपर्कात आहेत. त्यांच्याबाबतही आमची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप येळगावकर वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्या प्रवेशाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार आहे.’ (प्रतिनिधी)भाजपकडे इच्छुकांची मांदियाळीजिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांतून भाजपकडे अनेकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. कोरेगावातून माजी आमदार कांताताई नलावडे, सोपानराव गवळी तर कऱ्हाड उत्तरमधून उद्योजक अ‍ॅड. धैर्यशील पाटील-शिरगावकर आणि फलटणमधून डॉ. नंदकुमार तासगावकर, दीपक गायकवाड यांनी मागणी केली आहे. सातारामधून सुवर्णा पाटील, दत्ताजी थोरात, शिवाजी जाधव यांनी मागणी केली आहे. कऱ्हाड दक्षिणमधून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भारत पाटील, विष्णू पाटस्कर, नितीश देशपांडे, पाटणमधून दीपक महाडिक, नानासाहेब सावंत, कविता सत्रे यांनी मागणी केली आहे. माणमधून धनंजय आेंबासे, महादेव कापसे, बाळासाहेब खाडे, उज्ज्वल काळे, बाळासाहेब मासाळ, जालिंदर माळी, सतीश शेटे यांनी उमेदवारी मागितली आहे.