शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

अवकाळीचे पाणी अडविण्यास सुरुवात; सातारा जिल्ह्यात लोकसहभागातून २८५० वनराई बंधाऱ्यांची निर्मिती

By नितीन काळेल | Updated: November 28, 2023 18:50 IST

सातारा : पाणी हे जीवन आहे. पाणीच नसेल तर जीवसृष्टीवर विपरित परिणाम होतो. काहीशी अशीच संकल्पना समोर ठेवत मृद ...

सातारा : पाणी हे जीवन आहे. पाणीच नसेल तर जीवसृष्टीवर विपरित परिणाम होतो. काहीशी अशीच संकल्पना समोर ठेवत मृद व जल, पाणलोट क्षेत्र कृषी आयुक्तालयाच्या वतीने ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ संकल्पना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातही दि. २९, ३० रोजी मोहीम राबविण्यात येणार असून २ हजार ८५० बंधाऱ्यांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये ग्रामस्थांसह संस्थांचा सहभाग राहणार आहे.

राज्यात यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्यामुळे दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे. राज्य शासनाने उपाययोजनेचा एक भाग म्हणून राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. तर त्यानंतर अनेक महसूल मंडलातही दुष्काळी सवलती लागू केल्यात. पाऊस नसल्यानेच अशी स्थिती उद्भवली आहे. त्यामुळे पाण्याचे महत्व लक्षात येते. या अनुषंगानेच राज्य शासनाच्या मृद, जल संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन कृषी आयुक्तालयाच्या वतीने लोकसहभागातून वनराई बंधारे घेण्याची सूचना करण्यात आलेली आहे.त्यानुसार सातारा जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत आणि कृषी विभागानेही तयारी केलेली आहे. ग्रामविकास विभागासाठी प्रती गाव पाच वनराई बंधारे निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात २ हजार ८५० वनराई बंधारे निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून ते पूर्णही करण्यात येणार आहे. त्यासाठी दि. २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी ही संकल्पना जिल्ह्यात राबविली जाणार आहे.जिल्ह्यातील सर्व गावांत बुधवार आणि गुरुवारी ‘एक दिवस वनराई बंधाऱ्यासाठी’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यासाठी गावातील सर्व ग्रामस्थांचा सहभाग राहणार आहे. तसेच जिल्हा परिषद, हायस्कूल, खासगी शाळा आणि महाविद्यालयातील विद्याऱ्थी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, खासगी कंपनी, सहकारी संस्था, कारखाने आदींचा सहभाग घेऊन वनराई बंधारे बांधले जाणार आहेत.त्यामुळे दोन दिवसांत अधिकाधिक बंधारे निर्मितीसाठी पावले उचलली जात आहेत. यामुळे सध्या अनेक ठिकाणी ओढ्यांना पाणी नाही. पण, अवकाळी पाऊस चांगला झाल्यास पाणी अडवणूक होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच या बंधाऱ्यामुळे भविष्यातही पाणी साठून राहण्याने भूगर्भातील पाण्याची पातळीही वाढणार आहे. वनराई बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी अडविणे आणि त्याचा फायदा करुन घेणे अशीच ही संकल्पना आहे. 

जमिनीची पाणीपातळी वाढणारजिल्ह्यात ‘एक दिवस वनराई बंधारे कामासाठी’ ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखली राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून जिल्ह्यात २८५० वनराई बंधारे बांधले जाणार आहेत. हे बंधारे ओढ्यावर बांधले जाणार असल्याने अवकाळीचा पाऊस झाल्यास वाहून जाणारे पाणी अडले जाणार आहे. यामुळे जमिनीची पाणीपातळीही वाढणार आहे. यामध्ये ग्रामस्थ, संस्थाचा सहभाग घेऊन संकल्पना यशस्वी करण्यात येईल.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर