शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

'मोदी हटाव.. संसार बचाव', गॅस दरवाढविरोधात साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने 

By दीपक देशमुख | Updated: March 3, 2023 15:55 IST

महागाई विरोधात महागाईमुक्त भारत आंदोलन

सातारा : महागाईने जनता होरपळत असतानाच केंद्र सरकारने गॅस दरवाढ केली. याच्या निषेधार्थ राष्ट्रीय काग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसभवनासमोर मोकळे गॅस सिलिंडर रस्त्यावर ठेवून जोरदार निदर्शने केली. भाजपला घालवा संसार वाचवा, मोदी हटाव संसार बचाव, मोदी सरकारचा धिक्कार असो, गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे, अशा घाेषणा देत दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला.प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या आदेशानुसार व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकारच्या महागाई विरोधात महागाईमुक्त भारत आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनासमोर जमून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, भाजप सरकारच्या काळात महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे. गॅस दरवाढीने ग्रामीण भागातील महिलांना पुन्हा चुलीसमोर आणून ठेवले आहे. सरकारने गॅस दरवाढ मागे घ्यावी.यावेळी मोदी हटाव संसार बचाव, मोदी सरकारचा धिक्कार असो, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो, गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अल्पनाताई यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, धनश्री महाडिक, जगन्नाथ कुंभार, मनोज तपासे, अन्वर पाशाखान, सुषमा राजेघोरपडे, रजिया शेख, अरबाज शेख आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcongressकाँग्रेसInflationमहागाईCentral Governmentकेंद्र सरकार