शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

Lok Sabha Election 2019 काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ५० वर्षे पाण्याचेच राजकारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:37 PM

कोरेगाव : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीमुळे सामान्य जनता पेटून उठली असून, त्यांना विकासाचे राजकारण ...

कोरेगाव : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामगिरीमुळे सामान्य जनता पेटून उठली असून, त्यांना विकासाचे राजकारण नको तर विकास हवा आहे. त्यामुळे आता जनता पाठीशी असल्याने महायुती माढा, बारामती काय सातारासुद्धा जिंकेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.दरम्यान, साताऱ्याची लढाई ही राजा विरुद्ध प्रजा असून, राजांबद्दल मी बोलणार नाही, सगळ्यांना सगळे माहीत आहे, असा चिमटाही काढत त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर थेट टीका करणे टाळले.कोरेगाव येथे महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, डॉ. अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष महेश शिंदे, मनोज घोरपडे, ‘रिपाइं’चे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष जाधव, शहराध्यक्ष राहुल बर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, ‘आजच पंतप्रधानांची अकलूज येथे माढा मतदार संघाची सभा झाली. पश्चिम महाराष्टÑातून मोठा जनसागर लोटला होता. शरद पवार यांना हवेचा अंदाज येतो, असे म्हणतात, ते खरे आहे, म्हणून त्यांनी अपघात टाळण्यासाठी यू टर्न घेतला. अगोदर स्वत: फलंदाजी करणार म्हणून गवगवा केला आणि सातव्याच दिवशी राखीव खेळाडू म्हणून राहणे पसंत केले. एकूणच महायुतीला सर्वत्र चांगले वातावरण असून, माढाच काय, बारामती आणि सातारा देखील आम्हीच जिंकणार आहोत.’काँग्रेस-राष्टÑवादीने ५० वर्षे पाण्याचेच राजकारण केले. सातारा जिल्हा पाणीदार असताना, त्याच्या हक्काचे पाणी इतरत्र पळविण्याचे पाप केले. या जिल्ह्याला दुष्काळाचा कलंक लावला. या उलट भाजप सरकारने सातारा जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यासाठी चार हजार कोटींहून अधिक निधीची तरतूद केली. आजच गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेचा अंतिम स्लॅब देखील पडला असून, उरमोडी, वसना-वांगणासह धोम बलकवडी योजनांची कामे मार्गी लावली आहेत. या योजनांना केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेण्याबरोबर चार हजार कोटींहून अधिक निधीची तरतूद केली असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.डॉ. शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणावरून राज्यव्यापी दौरा केला, त्यांचा काटा कोणी काढला, हे जनतेला माहीत आहे. त्यासाठी जावळीचा गडी आणला, त्यांनी माथाडी कामगार बरोबरआणले. त्यांनी दहा वर्षांत काही केले नाही, स्थानिक स्वराज्य संस्था बंद पाडण्याचे काम केले. तालुक्याचा दुष्काळ ते साधा हटवू शकलेनाहीत. त्यांना जनता काय करूशकते, हे दाखवून देणार असून, कोरेगावातच मुक्काम ठोकणार आहे, असा इशारा देत नरेंद्र पाटील यांनी डॉ. शालिनीताई पाटील यांचा जरंडेश्वर साखर कारखाना स्वस्त:त लाटणाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनीचौकशी करावी आणि कारखान्याच्या शेतकरी-सभासदांना न्याय द्यावा, अशी विनंती केली.पश्चिम महाराष्टÑावर अन्याय नाही...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे असून, ते पश्चिम महाराष्टÑावर अन्याय करतील, अशी टीका काँग्रेस-राष्टÑवादीने केली होती. आम्ही सत्तेत येण्यापूर्वी आम्हाला वाटत होते, त्यांनी पश्चिम महाराष्टÑाचे भले केले आहे; मात्र प्रत्यक्षात कसलेही काम झाले नव्हते. मी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विदर्भच काय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्टÑाला न्याय देण्याचे काम केले. सातारा जिल्ह्यात राष्टÑीय महामार्गासाठी चार हजार कोटी तर पाणी योजनांसाठी चार हजार कोटी रुपये दिल्याचे त्यांनी सांगितले.कॉलर आणि मिशा !नरेंद्र पाटील आणि महेश शिंदे हे खासदार उदयनराजे भोसले यांच्या कॉलरच्या स्टाईलवर बोलले. ‘कॉलर दिवसभर वर राहत नाही, तर मिशा दिवसभर राहतात,’ असे नरेंद्र पाटील म्हणाले. महेश शिंदे म्हणाले, ‘मिशीने सातारा जिल्हा हालून गेला असून, कॉलर उडायच्या आतच फाटून गेली आहे.’

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक