शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे, ठाकरेंच्या शिवसेनेने एकत्र निवडणूक लढावी : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 05:44 IST

केंद्राकडून यंत्रणांचा गैरवापर, पवार यांचं वक्तव्य.

कऱ्हाड (जि. सातारा) : राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि डाव्या पक्षांनी एकत्रित निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज आहे. तसा विचार आमच्या मनात आहे. मात्र, प्रत्यक्षात तशी चर्चा अद्याप झालेली नाही. येत्या काळात त्याबाबत चर्चा होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली.

कऱ्हाड येथे आयोजित पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, केंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय. या यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. ही बाब लोकशाहीला धरून नाही. मनीष सिसोदिया यांच्यावर झालेली कारवाई हा त्याचाच एक भाग आहे. आठ राज्यांत वेगवेगळ्या नेत्यांवर अशा पद्धतीने कारवाई झाली. ज्यांच्यावर अशी कारवाई झाली त्या नेत्यांची यादी पंतप्रधानांना पत्राद्वारे पाठविली आहे. या यादीतील अनेक नेते असे आहेत की, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावरील कारवाई काढून घेण्यात आली.     नागालॅण्ड आणि मेघालयमध्ये राष्ट्रवादीने निवडणुका लढविल्या. मात्र, नागालॅण्डमध्ये अधिक लक्ष घातले. त्या ठिकाणी आम्हाला सात जागा मिळून विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळाले. इतर राज्यांत असेच लक्ष दिले तर चित्र निश्चितच बदललेले दिसेल, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.  

त्यावेळी ते देशद्रोही नव्हते का?

  • नवाब मलिक यांच्याविषयीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. मात्र, असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना देशद्रोही कसे म्हणू शकतात? एकाच मंत्रिमंडळात ते दोघेही सहकारी मंत्री 
  • होते, त्यावेळी ते देशद्रोही नव्हते का? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. 

नाफेडने कांदा खरेदी करावा! कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. या शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नाफेडने मोठ्या प्रमाणावर कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही पवार यांनी केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेElectionनिवडणूक