शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
3
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
4
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
5
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
6
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
7
"शाहरुख खानसोबत काम करताना तो...", निवेदिता सराफ यांनी सांगितला अनुभव; जॅकी श्रॉफ तर...
8
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
9
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
10
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
11
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली घोषणा
12
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
13
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
14
दिवाळीआधीच धमाका! विवोचा मिड-रेंज स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि खासियत
15
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
16
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
17
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
18
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
19
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
20
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान

कॉँगे्रसवाल्यांनो.. हवेतून खाली या !

By admin | Updated: February 12, 2015 00:35 IST

वाल्मिकींचा घरचा आहेर : बैठकीतील कमी उपस्थिती पाहून तीव्र नाराजी

सातारा : ‘काँग्रेसचा हात गरिबांच्या साथीला, असं फक्त आपण म्हणत असतो. गरिबांना मारलं, लुटलं जात आहे, तरीही आपण त्यांना साथ मात्र देत नाही. त्यामुळेच आता दिल्लीत अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले आहेत. काँग्रेसची ही स्थिती बदलायची असेल, तर आपल्याला हवेतून खाली आले पाहिजे; तरच पक्ष मजबूत होईल,’ अशा शब्दांत अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी श्योराज जीवन वाल्मिकी यांनी सर्वांनाच सुनावत घरचा आहेर दिला. दरम्यान, यावेळी त्यांनी बैठकीला कमी उपस्थिती पाहून नाराजी व्यक्त करीत जिल्हा काँग्रेसबद्दल नापसंतीही व्यक्त केली. येथील जिल्हा काँग्रेस कमिटीत आयोजित बैठकीत त्यांनी मार्गदर्शन करतानाच पक्षासाठी योगदान देण्यास सर्वांनाच बजावले. यावेळी आमदार आनंदराव पाटील, अ‍ॅड. विजयराव कणसे, साहेबराव जाधव, बाबूराव जंगम गुरुजी, मनोजकुमार तपासे, रजनी पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, प्रथम वाल्मिकी यांचा जिल्हा काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. वाल्मिकी यांनी पक्षाला घरचा आहेर देतानाच दिल्लीपासून ते गावपातळीपर्यंतचा पक्षाची बाजू पदाधिकाऱ्यांच्या समोर आणली. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कौतुकही केले. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘आपल्या देशात साधी सुई बनत नव्हती; पण काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यापासून देशाचा विकास होऊ लागला. पक्षाने सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद दिली. पक्षाने देशावर अनेक वर्षे राज्य केले. पण, आज पक्षाची स्थिती कमकुवत आहे. याला कारणे काय आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. गरिबांचे कैवारी म्हणत असलो तरी आपण तसे वागतो का, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण गरिबांच्या बाजूने आपण राहत नाही. दिल्लीत केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांना काँग्रेसची म्हणजेच गरीब आणि झोपडपट्टीतील लोकांची मते मिळाली आहेत. आपल्याला पुन्हा मजबूत व्हावे लागेल. त्यासाठी हवेतून आपल्याला खाली यावे लागेल. सर्वांनी चिंतन, मनन करावे व पक्षाच्या वाढीस हातभार लावावा.’आमदार आनंदराव पाटील म्हणाले, ‘जिल्ह्यात पूर्वी काँग्रेसचा एक आमदार होता. आज दोन आमदार पक्षाचे आहेत. जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे संघटन सुरू आहे. आगामी काळात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारी करणे गरजेचे आहे.’अ‍ॅड. कणसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे पक्षाचे नुकसान झाल्याची तोफ डागली. ते पुढे म्हणाले, ‘काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत मरगळ आली आहे. याला अनेक कारणे आहेत. जिल्ह्यात आज भाजपचा एकही आमदार नाही. आज दिल्लीतील निकालाने देशातील जनता कोणाची गुलाम नाही, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे यापुढे आपण कसे लोकांपुढे जायचे, याचा विचार करण्याची आज खरी गरज आहे. (प्रतिनिधी)आठपैकी पाच पालिका कॉँग्रेसच्या !बैठकीत मार्गदर्शन करताना विजयराव कणसे यांनी जिल्ह्यातील आठपैकी पाच नगरपालिका पक्षाकडे आहेत, असे सांगितले. हे एकताच , उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते चमकून एकमेकांकडे पाहू लागले. सर्वांच्याच चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव स्पष्टपणे दिसून येत होते.