शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

गोंदवलेमध्ये ‘श्री राम जय राम जय जय रामऽऽ’चा जयघोष, महोत्सवाची सांगता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 14:05 IST

श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता

दहिवडी : गोंदवले बुद्रुक येथे ‘श्री राम जय राम जय जय राम’च्या या नामस्मरणाच्या जयघोषात श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता रविवारी पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी समाधीवर गुलाल, पुष्प अर्पण करुन झाली. रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम.. या भक्तिभावाने परिसर न्हाऊन निघाला होता. पहाटेच्या थंडीतही टाळाचा गजर अन् मुखाने हरिनामाचा जप करण्यात भाविक तल्लीन झाले.महोत्सवास लाखो मुंबई, पुण्यासह परराज्यातून, तसेच माण तालुक्यातील परिसरातून भाविक मोठ्या संख्येने उत्साहात उपस्थित होते. कोठी पूजनाने प्रारंभ झालेला हा उत्सव दहा दिवसांपासून भावपूर्ण वातावरणात सुरू होता. समाधीवर अखंड रामनाम जप सुरू होता. संपूर्ण मंदिर परिसर गजबजून गेला होता.ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर परिसरावर आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आल्याने परिसर उजळून निघाला होता. सोहळ्यानिमित्त श्रींच्या समाधी मंदिराची चांगल्या प्रकारे सुंदर सजावट करुन मंदिराच्या संपूर्ण शिखरासह परिसरात रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटे २ वाजून ३० मिनिटांनी मंदिर मुख दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे सव्वातीन वाजता मंदिरात पहिली घंटा करण्यात आली. साडेतीन ते चार वाजता सनईचे मंजुळ वादन करण्यात आले. चार ते पावणेपाच या दरम्यान भुपाळी काकड आरतीनंतर मंगल धुन सनईने सुरुवात करून धार्मिक कार्यक्रम करण्यात आले.यावेळी महाराजांच्या विचारावर कीर्तनरूपी मार्गदर्शन करण्यात आले. मुख्य समाधी मंदिरात महाराजांच्या समाधीला वस्त्र चढवून त्यावर तुळशी फुले अर्पण करण्यात आली. पहाटे ५ वाजून ५५ मिनिटांनी समाधी मंदिरातून ‘श्रीराम श्रीराम श्रीराम” असा जयघोष सुरु झाल्यावर जमलेल्या लाखो भाविकांनी मोठ्या चैतन्यमय प्रसन्नतेत समाधीवर गुलाल फुलांची उधळण केली. सर्व भाविकांना समाधी मंदिरात आणि भोजन कक्षात सुरू असणारे कार्यक्रम पाहता यावेत म्हणून ठिकठिकाणी स्क्रिनची व्यवस्था केली होती. त्यामुळे भाविकांना हा सोहळा चांगल्या प्रकारे पाहता आला. मंदिर परिसरात जाऊन भाविकांनी दर्शन घेतले.श्रींचे फोटो, मिठाई, दैनंदिन वापराच्या वस्तू, प्रसाद, पेढे, जिलेबी खरेदीसाठी भाविकांची वर्दळ होती. महिला पर्स, लहान मुलांची खेळणी, थंडीत वापराच्या वस्तू खरेदी करताना दिसत होत्या. भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन, समाधी मंदिर समिती, ग्रामपंचायतीने सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, तहसीलदार श्रीशैल्य व्हट्टे यांची उपस्थिती होती.पोलिस उपविभागीय अधिकारी, सहायक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे, गोपनीयचे प्रकाश इंदलकर, वाहतूक शाखा व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख व्यवस्था ठेवली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, सरपंच जयप्रकाश कट्टे, उपसरपंच संजय माने, अंगराज कट्टे आदींनी भाविकांचे स्वागत केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर