शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

CoronaVIrus Satara : सातारा जिल्ह्यात शनिवार-रविवारी पूर्णपणे संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 18:42 IST

CoronaVIrus Satara : सातारा जिल्ह्यातील संचारबंदी आदेशामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सोमवारपासून ढील देण्याचा निर्णय घेतला असल्याने सातारा जिल्ह्यातील जनतेला थोडाफार दिलासा मिळणार आहे. किराणा मालाची दुकाने, भाजी विक्रीची दुकाने, फळ विक्री आदी सेवा सोमवारपासून (दि.७ जून) सकाळी नऊ ते दोन या वेळेत सुरू होणार असल्याने निर्बंधांमुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेचा जीव भांड्यात पडला आहे.

ठळक मुद्देअत्यावश्यक सेवा सोमवार ते शुक्रवार सुरूनिर्बंध हटवल्याने जिल्हावासियांना दिलासा

सातारा : जिल्ह्यातील संचारबंदी आदेशामध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सोमवारपासून ढील देण्याचा निर्णय घेतला असल्याने सातारा जिल्ह्यातील जनतेला थोडाफार दिलासा मिळणार आहे. किराणा मालाची दुकाने, भाजी विक्रीची दुकाने, फळ विक्री आदी सेवा सोमवारपासून (दि.७ जून) सकाळी नऊ ते दोन या वेळेत सुरू होणार असल्याने निर्बंधांमुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेचा जीव भांड्यात पडला आहे.राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट ऑक्सिजन बेडसची व्यापकता या निकषानुसार सातारा जिल्हा चौथ्या स्तरांमध्ये समाविष्ट झाला आहे. तरीदेखील कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती अजून टळलेली नाही. या परिस्थितीमध्ये संसर्ग रोखला जाईल आणि सर्वसामान्यांचे जीवनमान सुखकर होईल, या उद्देशाने जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन आदेश काढले, त्यानुसार जिल्ह्यामध्ये सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सायंकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत व शनिवार रविवार दोन दिवस पूर्ण कालावधीसाठी संचारबंदी लागू केलेली आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी मुभा दिली असली तरी वेळेचे बंधन घालून दिले आहे. बाजार समित्यांच्या वेळा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू ठेवता येतील. मात्र या ठिकाणी केवळ घाऊक किंवा किरकोळ विक्रेत्यांना जाऊन माल घेता येईल. कोणत्याही वैयक्तिक व्यक्तीस बाजार समितीच्या ठिकाणी प्रवेश नसेल.

जिल्ह्यातील व्यायाम शाळा, केश कर्तनालय, सौंदर्य केंद्रे, स्पा वेलनेस सेंटर सुरू राहतील, मात्र त्याठिकाणी लसीकरण घेतलेल्या व्यक्तीलाच प्रवेश मिळणार आहे. शेतीविषयक कामे चार वाजेपर्यंत करायला मुभा आहे आणि दोन वाजेपर्यंत शेती विषयकची उपकरणे खते बियाणे यांची विक्रीची दुकाने सुरू राहणार आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा निवडणूक विषयक या बैठका घेण्यास परवानगी दिली आहे. ज्या ठिकाणी सभा बैठक घेण्यात येईल त्याठिकाणी जेवढे लोक बसण्याची क्षमता आहे त्यापेक्षा ५० टक्के लोकांना परवानगी राहणार आहे. इतर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तीला ही पास बंधनकारक राहणार आहे, गरिबांसाठी लाभदायी ठरलेली शिवभोजन थाळी योजना सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आलेले आहे.काय सुरू होणार?किराणा मालाची दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, अंडी, मासे, मटण, चिकन विक्री, सर्व रुग्णालय औषध विक्री भेटणारी हॉस्पिटल ॲनिमल केअर सेंटर्स, कोल्ड स्टोरेज आणि गोदाम, सार्वजनिक वाहतूक, भारतीय रिझर्व बँक आणि आरबीआयने नियुक्त केलेल्या संस्था सेबीने अधिकृत केलेल्या संस्था स्टॉक एक्सचेंज डिपॉझिटरी क्लिअरिंग ऑपरेशन्स, दूरसंचार सेवांच्या दुरुस्ती देखभालीची सेवा, मालवाहतूक पाणी पुरवठा सेवा, शेती संबंधी उपक्रम बियाणे खते उपकरणे व त्याची दुरुस्ती, सर्व वस्तूंची निर्यात आयात, ई-कॉमर्स सेवा अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी, अधिकृत प्रसार माध्यमे, पेट्रोल पंप पेट्रोलियम उत्पादने, सरकारी आणि खाजगी सुरक्षा सेवा, गॅस पुरवठा एटीएम पोस्टल सेवा, विमा वैद्यकीय हक्क सेवा, सर्व नॉन बँकिंग फायनान्शिअल कार्पोरेशन, सर्व सूक्ष्म वित्तसंस्था, न्यायालय, वकिलांची कार्यालय, वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिकेहे बंदच राहणारअत्यावश्यक नसलेली दुकाने आस्थापना, मॉल, सिनेमागृहे नाट्यगृह, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रार्थनास्थळे करमणूक कार्यक्रम मेळावे इत्यादी पूर्णपणे बंद, धार्मिक स्थळाच्या ठिकाणी सेवेकरी यांना पारंपारिक धार्मिक सेवेसाठी प्रवेश राहिल, जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कुठलाही कार्यक्रम घेता येणार नाहीमहत्त्वाचे मुद्दे

  •  हॉटेल रेस्टॉरंट केवळ पार्सल घरपोच सेवेसाठी सुरू राहतील
  • अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त इतर खासगी कार्यालये बंद राहतील
  • क्रीडाविषयक बाबी सोमवार ते शुक्रवार या कालावधीमध्ये सकाळी पाच ते नऊ या वेळेत सुरू होतील शनिवार, रविवार मात्र पूर्ण बंद राहील
  • चित्रीकरणास परवानगी असेल; आयसोलेशन बारमध्ये चित्रीकरण व वास्तव्य बंधनकारक
  •  २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न कार्य घेता येतील त्यासाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागेल
  • जास्तीत जास्त २० नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यविधी, दशक्रिया विधी
  • मजुरांच्या राहण्याची व्यवस्था असलेलीच बांधकामे सुरू ठेवता येतील
  • केश कर्तनालय सूर राहील मात्र लस घेतलेल्या व्यक्तींनाच त्या ठिकाणी प्रवेश असेल
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारी