शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कुटुंबियांसह कण्हेरखेड गावास दिली भेट, साधेपणा पाहून ग्रामस्थ भावनाविवश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:08 IST

जमिनीवर डोके टेकवत कण्हेरखेडच्या भूमीला अभिवादन केले

कोरेगाव : कण्हेरखेडच्या पवित्र मातीने भारताची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याची ताकद दिली. श्रीमंत महादजी शिंदे हे या पवित्र भूमीतील वीर योद्धा होते. आज या पवित्र मातीला वंदन करताना आनंद होत आहे. मी कोणी राजकीय नेता अथवा केंद्रीय मंत्री म्हणून या गावात आलो नाही, तर या कुटुंबातील प्रमुख म्हणून आलो आहे. जीवनातील शेवटच्या श्वासापर्यंत कण्हेरखेडच्या विकासामध्ये योगदान देणार असून, शिंदे मंडळींबरोबर कायम राहणार आहे, असा शब्द केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिला.मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर असून, सोमवारी सायंकाळी पाच वाजता त्यांनी पत्नी प्रियदर्शनीराजे आणि पुत्र आर्यमानराजे यांच्या समवेत कण्हेरखेड गावास भेट दिली. गावात आगमन झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आपले पिताश्री माधवराव शिंदे यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर जमिनीवर डोके टेकवत कण्हेरखेडच्या भूमीला अभिवादन केले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कऱ्हाड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, फलटणच्या श्रीमंत महाराजा महादजी शिंदे प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन शिंदे आदी मान्यवर आणि प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

ज्योतिरादित्य शिंदे यांनी कण्हेरखेड गावातील सर्व मंदिरांना भेट देऊन दर्शन घेतले. तसेच नगर प्रदक्षिणा घातली. राजवाड्याच्या आवारात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी ग्रामस्थांसह शिंदे कुटुंबीयांशी संवाद साधला. पाच ते सहा वर्षातून मी कण्हेरखेडला येतो. या गावचा मी सुपुत्र आहे. या गावच्या विकासामध्ये मी आजवर योगदान दिले आहे, भविष्यात देखील देणार आहे. गेल्यावेळी जेव्हा आलो, त्यावेळी पाणी योजनेचा विषय ग्रामस्थांनी उपस्थित केला होता, तो त्याचवेळी मार्गी लावला आहे. यापुढेही विकासात योगदान देत राहू.

शिंदे कुटुंबीयांसोबत घेतले भोजनछत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून ते श्रीमंत महादजी शिंदे यांच्यापर्यंतच्या इतिहासाला त्यांनी यावेळी उजाळा दिला. तसेच, सहकुटुंब दुष्यंतराजे शिंदे फाकडे यांच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मनोजदादा घोरपडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरJyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे