वाझोलीतील माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रवीण पाटील यांची संघाच्या अध्यक्षपदी तर जयवंतराव मोरे यांची उपाध्यक्ष म्हणून तर सचिवपदी सुभाष मोरे यांची निवड करण्यात आली. यावेळी एकमेकांशी हितगुज करताना शालेय जीवनातील आठवणींना माजी विद्यार्थ्यांनी उजाळा दिला. भूतकाळात डोकावताना आणि वर्तमानाची त्याच्याशी सांगड घालताना सर्वांनाच अनोख्या दुनियेची सफर घडली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यातील सुखानुभूतीचा प्रत्यय रोमांचित करून गेला. मुख्याध्यापक प्रदीप वीर यांनी व उपशिक्षक सतीश कोकाटे यांनी शाळेसाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांची माहिती या कार्यक्रमावेळी दिली. त्यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी सर्व मागण्या एकमताने मान्य केल्या.
माजी सरपंच अशोक मोरे, पोलीस पाटील विजय सुतार, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष आनंदा मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेश चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संदीप पाटील, अशोक मोरे, प्रकाश मोरे, लालासाहेब मोरे, निवास पाटील, विलास पाटील, दीपक पाटील आदी उपस्थित होते. आनंदा मोरे यांनी आभार मानले.
फोटो : १७केआरडी०१
कॅप्शन : वाझोली, ता. पाटण येथील जिल्हा परिषद शाळेत माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यात आला. यावेळी विजय सुतार, राजेश चव्हाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.