शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'वाड्यावर' या, 'पाटणकरां'नी धाडलं मावळ्यांना आवातनं! भाजप प्रवेश निश्चित, सोपस्कार पूर्ण करण्यासाठी सोमवारी मावळ्यांशी संवाद

By प्रमोद सुकरे | Updated: May 25, 2025 20:36 IST

शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पाईक, माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर आता 'भाजप'च्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजप प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून निश्चित मानला जातोय.

प्रमोद सुकरे 

कराड- शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत पाईक, माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर आता 'भाजप'च्या वाटेवर आहेत. त्यांचा भाजप प्रवेश गेल्या अनेक दिवसांपासून निश्चित मानला जातोय. पण त्यासाठीचे सोपस्कार पूर्ण करण्यासाठीच सोमवार दि.२६ रोजी त्यांनी आपल्या मावळ्यांना वाड्यावर येण्याचं अवातनं धाडलं आहे. आता या मेळाव्यात ते आपल्या पुढील राजकीय वाटचालीबद्दल नेमकी काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

खरंतर पाटण तालुका हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. येथे कोयना धरणामुळे मात्र भूकंपाच्या छोट्या मोठ्या धक्क्यांची सवय येथील जनतेला झाली आहे. पण येथील राजकारण मात्र नेहमीच दोन गटा भोवतीच फिरत राहिले आहे. सध्या मात्र येथे 'राजकीय भूकंपा'च्या हालचाली मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्याला पाटणकरांच्या वाड्यावर पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी बोलावलेल्या मावळ्यांच्या मेळाव्यावरून पुष्टीच मिळते.

  पाटणकर पाचवेळा आमदार

 विक्रमसिंह पाटणकर यांची राजकीय कारकीर्द १९८३ पासून सुरू झाली. त्यानंतर ५ निवडणुका त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले. यादरम्यान त्यांनी एकदा सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून ही काम पाहिले.पण सध्या त्यांच्या हातातून पाटणची सत्ता निसटली आहे. ती परत मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपमधील प्रवेशाबाबत ची प्रक्रिया हा त्याचाच भाग मानला जातो.

 आता 'जय श्री राम' म्हणणार!

 पाटणकरांनी बोलवलेला हा मेळावा त्यांच्याच वाड्याच्या तटबंदीच्या आत असणाऱ्या श्री राम मंदिरात होणार आहे. या मेळाव्यात बदलती राजकीय परिस्थिती, पाटण तालुक्यातील बदलते राजकारण या सगळ्या बाबतीत ते भूमिका मांडणार असल्याचे निकटवर्ती सांगत आहेत. त्यावेळी पाटणकर ही 'जय श्रीराम' म्हणणार हे निश्चित आहे. 

आधी प्रवेश, मग मेळावा!

पाटणकरांचा भाजपमधील प्रवेश हा निश्चितच आहे. परंतु ते अगोदर काही प्रमुख मावळ्यांच्या उपस्थित मुंबई येथे पक्ष कार्यालयात प्रवेश करतील. त्यानंतर ते पाटण तालुक्यात भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत एक भव्य मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन करतील असे भाजपमधील नेत्यांकडून सांगितले जात आहे. 

 नवा अध्याय सुरू होणार!

आजवर दोन गटाभोवतीच फिरत राहिलेल्या पाटणच्या मातीत आता पक्षीय राजकारणाची पाळेमुळे तितकीच रुजू लागली आहेत. पाटण तालुक्यात भाजपला आपली ताकद वाढवायची आहे. त्यामुळे पाटणकर सरकारांना सोबत घेण्याची चाल त्यांनी खेळली आहे. हा प्रवेश झाल्यानंतर पाटण तालुक्यातील राजकारणात नवा अध्याय सुरू होणार हे निश्चित!

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsatara-pcसातारा