शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: मोठी बातमी! कंधार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
3
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
4
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
5
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
6
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!
7
Swami Samartha: स्वामींची निरपेक्ष सेवा केलीत तर 'या' दोन गोष्टी तुम्हाला आयुष्यात मिळणारच!
8
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
9
पाकिस्तानच्या शेअर बाजारात भूकंप! कराची बाजारातील व्यवहार अचानक बंद; नेमकं काय घडलं?
10
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
11
२००० किमी प्रवास, आळीपाळीने चालवत होते कार; एका डुलकीनं थांबवला ६ जणांच्या आयुष्याचा प्रवास
12
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
13
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
14
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
15
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
16
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
17
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
18
Rohit Sharma Retires: 'आई, माझं स्वप्न भंगलं' रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर ढसाढसा रडली तरुणी, व्हिडीओ व्हायरल
19
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
20
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई

स्वच्छता मोहिमेत ४० पोती कचरा गोळा

By admin | Updated: June 5, 2015 00:14 IST

कास परिसर : पर्यावरण संतुलनाचे महत्व केले अधोरेखित -- गूड न्यूज

पेट्री : शहराच्या पश्चिमेस कास तलावावर गेल्या तीन दिवसांपासून राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत तब्बल ४० पोती कचरा गोळा करण्यात आला आहे. दरम्यान, यावेळी छोटीशी चिमुरडीदेखील कचरा गोळा करत होती. एकप्रकारे ती पर्यावरणाचे संतुलन राखण्यासंदर्भात सातारकरांना जाणीव करुन देत होती.जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून कास पठार, कास तलावाची ओळख आहे. याठिकाणी असंख्य पर्यटक येत असतात. परिसरात राजरोसपणे होणाऱ्या पार्ट्यामुळे बिअर, व्हिस्कीच्या बाटल्यांसमवेत प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्मोकोलच्या डिशेस, पेले सर्वत्र परिसरात पसरल्याने कास तलावावर घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच दगडांवर फोडलेल्या दारुच्या बाटल्यामुळे काचांचा ढीग पसरत आहे. यामुळे कास तलाव काच तलाव झाल्याचे दिसत असते. हे चित्र पाहून बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांच्यात नाराजी होवू नये याकारणास्तव कन्हैय्यालाल राजपुरोहित, माधव मोघे व त्यांच्या अनेक सहकारी मित्रांनी कोणाचीही मदत न घेता गेल्या तीन दिवसांपासून कास तलाव परिसरात स्वच्छता मोहिम राबविली.दरम्यान, प्लास्टिक, थर्मोकॉल डिशेस, पेले, दारुच्या बाटल्यासमवेत ४० पोती कचरा गोळा करण्यात आला. यावेळी कास गावातील काही स्थानिक गरजू ग्रामस्थांना रोजगार देवून त्यांच्याकडून कचरा गोळा करण्यात आला. याअगोदरही कन्हैय्यालाल राजपुरोहित व त्यांच्या मित्रमंडळींनी आसपासच्या ग्रामस्थांच्या मदतीने कचरा गोळा केला आहे. यामध्ये त्यांच्यासोबत फिरायला येणाऱ्या व्यक्तींनादेखील सहभागी करुन घेतले जाते. तसेच कासपठारावर फुलांचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सातारा ते कास या मार्गावर प्रती १ कि़ मी. अंतरावर कासपर्यंत पर्यावरण जनजागृती संदर्भातील सुवचने असणारे फ्लेक्स बसविणार असल्याची माहिती कन्हैय्यालाल राजपुरोहित यांनी यावेळी दिली. पर्यटकांसाठी उपाययोजना करण्याची गरज...आंतरराष्ट्रीय दर्जाचे जैवविविधता असणाऱ्या या पर्यटनस्थळी दरवर्षी लाखो पर्यटक फिरायला येतात. परंतू पर्यटकांच्या सोयीसाठी कोणतीही स्वच्छता गृहाची व्यवस्था येथे दिसत नाही. तसेच केलेला कचरा टाकण्यासाठी कोठेही डस्टबिन नाही. यासाठी पालिका व संयुक्त वन व्यवस्थापन समितीने वाढत्या पर्यटकांच्या सोयीसाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी मागणी जोर धरत आहे.कास तलावाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तलावातील पाण्यात खोलवर सूर्यकिरणे पोहचत असल्याने पाण्याचा दर्जा सर्वोत्कृष्ट आहे. वाहने, कपडे धुवून पाणी प्रदुषित होवू नये यासाठी उपाययोजना करावी. तसेच वेळोवेळी कारवाई होणे आवश्यक आहे. सुरक्षारक्षकाची देखील नेमणूक व्हावी.- माधव मोघे, स्वच्छताप्रेमी साताराकोणाच्या मदतीची अपेक्षा न करता स्वत:पासून स्वच्छतेस सुरूवात करून पर्यावरण संतुलन राखणे आवश्यक आहे. कास म्हणजे निसर्गत: आपल्यासाठी जणू स्वर्गच आहे. परंतु या परिसरात फिरायला येणाऱ्यांकडून कोणताही कचरा होणार नाही यासाठी स्वच्छता राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पावसाळ्यात कचरा पाण्यात मिसळू नये, यासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.-कन्हैय्यालाल राजपुरोहित, स्वच्छताप्रेमी नागरिक, सातारा