शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

महाबळेश्वर बसस्थानक परिसरातून पंधरा टन कचरा गोळा, युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 14:50 IST

महाबळेश्वर शहराच्या मुख्य भागामध्ये बसस्थानक परिसर येत असून येथे नगर पालिकेच्यावतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे बसस्थानकासह एसटी आगार परिसरातून सुमारे १५ टनहून अधिक कचरा व प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.

ठळक मुद्देप्लास्टिक बाटल्यांचा समावेश नगर पालिकेच्या स्वच्छता मोहिमेस वेगपंधरा वर्षांत प्रथमच स्वच्छताअभियानामुळे पंधरा वर्षांपासूनचा १५ टन कचरा गोळा

महाबळेश्वर : शहराच्या मुख्य भागामध्ये बसस्थानक परिसर येत असून येथे नगर पालिकेच्यावतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे बसस्थानकासह एसटी आगार परिसरातून सुमारे १५ टनहून अधिक कचरा व प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या.

महाबळेश्वर पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी तयार केलेल्या कृती आराखड्यासाठी स्थानिकांसह हॉटेल व्यावसायिक, व्यापारी तसेच शहरवासीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे व मुख्याधिकारी अमित दगडे पाटील यांनी केले.

महाराष्ट्रचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वरमध्ये दररोज हजारो पर्यटक भेट देतात. याच महाबळेश्वरला वर्षाकाठी पंधरा ते वीस लाख पर्यटक भेटी देतात. काही पर्यटक स्वत:च्या वाहनाने येतात तर काही पर्यटक एसटीने बसस्थानकामध्ये उतरतात. परंतु बसस्थानक परिसरच स्वच्छ असतो.

या परिसरातील पाहणी पालिकेने केल्यानंतर या परिसरातील अंतर्गत भागांत बसस्थानक कर्मचाऱ्यांनी दहा ते पंधरा वर्षे स्वच्छता मोहीम राबविण्यातच आली नाही, असे दिसून आले. महाबळेश्वर पालिकेकडून सलग तीन दिवस बसस्थानक परिसरात ही मोहीम राबविण्यात आली.

बसस्थानक परिसर हा शहराच्या मुख्य भागामध्ये येत असून हा अंदाजे दोन ते तीन एकरामध्ये पसरलेला आह. पुढे बसस्थानक तर मागील बाजूस एसटी आगार आहे. बसस्थानकात अंतर्गत भागांत वाढलेली झाडेझुडपे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्यांचा खच साठलेला होता.

पालिकेने तीन दिवस सफाई कामगार लावून या परिसरातून गेली दहा ते पंधरा वर्षांचा कचरा, प्लॉस्टिक पिशव्या दोनशेहून अधिक व एसटी धुतल्या जातात. या ठिकाण्यामधील प्लास्टिक कचरा डंपर लावून जेसीबीच्या साह्याने काढण्यात आला. यामुळे बसस्थानक परिसर सुंदर व स्वच्छ दिसू लागला. स्थानिक नागरिकामधून नगरपालिकेचे कौतुक होऊ लागले आहेपंधरा वर्षांत प्रथमच स्वच्छतामहाबळेश्वर बसस्थानक परिसरात झाडलोट करणारे एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांची संख्या वाढवली आहे. नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानामुळे पंधरा वर्षांपासूनचा १५ टन कचरा गोळा करण्यात आला. पालिकेच्या पुढाकाराने बसस्थानक परिसरात जवळपास दहा वर्षांनंतरच रंगरंगोटीचे काम सुरू केले आहे. स्वच्छता मोहिमेमुळेच बसस्थानक परिसर आगार झाल्यापासून पहिल्यांदाच स्वच्छ करण्यात आला. यामुळे शहरातून व पर्यटकामधून कौतुक होऊ लागले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान