००००००
पाणीसाठे आटले
सातारा : जिल्ह्यातील अनेक भागांत यंदा चांगला पाऊस झालेला असल्याने पाणी चांगले असेल, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, अनेक नदी, ओढ्यांचे पाणी आटले आहेत. भूजल पातळीत घट होत असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.
००००००
व्यवसाय पूर्वपदावर
सातारा : कोरोनामुळे तब्बल सहा महिन्यांचे लॉकडाऊन असल्याने अनेक व्यवसायांना फटका बसला होता. मात्र, आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे व्यापारी, कामगारांना दिलासा मिळाला आहे. मात्र, महामाई कायम असल्याने चिंतेचे वातावरण आहे.
.................
फ्लेमिंगोची गैरहजेरी
मायणी : हिवाळा संपत आला तरी फ्लेमिंगो हे परदेशी पाहुणे पक्षी अद्याप मायणी तलाव परिसरातील छोट्या-मोठ्या पाणवठ्यावर दाखल झाले नाहीत. त्यामुळे यंदा ऐतिहासिक मायणी तलावाचा त्यांना विसर पडला की काय? अशी प्रतिक्रिया पक्षीनिरीक्षक व्यक्त करीत आहेत.
.......
पुलाची मागणी
सातारा : साठेवाडी (ता. सातारा) येथील उरमोडी नदीवर तातडीने पूल बांधावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. शिवाजीराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली. दरम्यान, या पुलांचा प्रस्ताव लवकरच सादर करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिली आहे.
......
शेतीचे नुकसान
सातारा : पुसेगावसह परिसरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या कुत्र्यांच्या संख्येमुळे नागरिकांना रस्त्याने जाताना भीती वाटू लागली आहे. रस्त्यावर कसेही कुठेही वेगाने पळणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार पडून जखमी झाल्याच्या अनेक घटना परिसरात घडलेल्या आहेत.
.....
उपमार्गावर कचरा
सातारा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील गटारीची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. या नाल्यांमध्ये कचरा साचून राहिल्यामुळे त्यातील पाणी व कचरा महामार्गालगतच्या उपमार्गावर येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या उपमार्गावरून दुचाकीस्वारांना जाताना मोठी कसरत करावी लागते.
........
धोकादायक वाहतूक
सातारा : वर्धनगड घाटातून उसाची वाहतूक धोकादायकरीत्या सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वर्धनगड घाटामध्ये रामोशीवाडी जवळ पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे घाटातून ये-जा करणाऱ्या वाहनांना येथील बायपास मार्गावरून जावे लागत आहे. हा रस्ता चर्चा असल्याने मोठमोठे दगड-गोटे ओलांडून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
......
नागरिकांची कुचंबणा
वडूज : वडूज (ता. खटाव) येथील बाजार पटांगण परिसरात स्वच्छतागृह नसल्याने बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. वडूज हे तालुक्याचे मुख्यालय असल्याने कामासाठी येणाऱ्या नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. बाजार पटांगण परिसरामध्ये आठवडी बाजार भरतो. या बाजारात ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या संख्येने शेतमाल विक्रीसाठी घेऊन येतात.
........
रॅलीद्वारे प्रबोधन
सातारा : जावळी तालुक्यात विपुल वनसंपदा असून, काही समाजकंटक गैरसमजुतीतून विनाकारण वणवे लावत आहेत. त्यामुळे दुर्मीळ औषधी वनस्पती सूक्ष्मजीवांचा यामध्ये बळी जात आहे. वणवे रोखण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाच्यावतीने केले आहे.
..........................
कारवाईची मागणी
सातारा : दुचाकी वाहनांच्या मागे नंबरप्लेटवर क्रमांकाबरोबरच काव्यपंती चारोळ्या भाई, दादा याच विविध नावे येण्याचे प्रमाण आजही कायम आहेत. याद्वारे कधी-कधी आपल्या प्रेमाचा तर कधी जीवनाचा तर कधी आपण किती मौल्यवान आहोत, याचा देखावा काव्यपंक्तीच्या सादरीकरणातून केला जात आहे.
.........
निर्बंध पाळणे गरजेचे
सातारा : जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणूक मतमोजणी झाली. हा निकाल ऐकण्यासाठी झालेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. कोरोनाचा धोका कमी झाला असला तरी महामारी संपलेली नाही. त्यामुळे अनलॉक प्रक्रियेत कोरोनाबाबतची निर्बंध पाळणे गरजेचे आहे.