शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नारळाच्या मोहातून ल्हासुर्णे येथे युवकाचा बळी, झाडाची फांदी तुटून पडला विहिरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 18:06 IST

मृतदेह बाहेर काढण्यास तब्बल बारा तास लागले. कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली आहे.

कोरेगाव : ल्हासुर्णे येथील युवक प्रतिक लक्ष्मण भांडवले या १९ वर्षाच्या युवकाचा नारळाच्या मोहातून बळी गेला. रात्रीच्या अंधारात झाडावरील नारळ तोडत असताना, अचानक फांदी तुटली आणि प्रतिक झाडालगत असलेल्या विहिरीच्या कठड्यावर पडला. त्यानंतर पाण्यात पडून त्याचा बुडून मृत्यु झाला.ही घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यास तब्बल बारा तास लागले. कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद झाली आहे.याबाबत माहिती अशी की, प्रतिक हा ल्हासुर्णे येथील रहिवासी असून, रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले महाविद्यालयात शिक्षण घेत होता. सोमवारी सायंकाळी तो गावातील पारावर मित्रांबरोबर गप्पा मारत बसला होता, त्यानंतर मित्र विशाल सुतार याच्यासोबत गावातीलच चिरका नावाच्या शिवारातील प्रमोद सर्जेराव भिलारे यांच्या शेतातील नारळाच्या झाडावरुन नारळ तोडण्यास तो गेला होता.नारळ काढण्यासाठी प्रतिक झाडावर चढला, त्याचवेळी त्याने पकडलेली फांदी तुटली आणि तो थेट विहिरीच्या कठड्यावर कोसळला. त्यानंतर तोल जाऊन पाण्याने काटोकाट भरलेल्या विहिरीत तो पडला आणि तेथेच गंटागळ्या खाऊ लागला. रात्रीचा अंधार आणि थंडीमुळे त्याला पोहता आले नाही, दरम्यान मित्र विशाल याने गावातील इतरांना माहिती देऊन मदत मागितली.मात्र दरम्यानच्या काळात प्रतिक हा बुडाला. पोलीस पाटील शिवाजी सावंत यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पोलीस पाटील शिवाजी सावंत, सरपंच संतोष चव्हाण, उपसरपंच राजेंद्र मचिंदर, माजी सरपंच प्रशांत संकपाळ, विशाल सावंत, राजेंद्र जाधव, समाधान माने, अमोल कदम, संग्राम गायकवाड, तुषार सावंत, संदीप सुतार, सतीश चव्हाण, जयवंत माने, अनिल भांडेकर यांच्यासह ग्रामस्थांनी प्रयत्न केले. कोरेगावातील नातेवाईक चंद्रकांत सुतार यांनी मढपंप आणल्यानंतर विहिरीतून पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास प्रतिकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दीपक रामचंद्र भांडवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कोरेगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक सचिन साळुंखे तपास करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर