शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस प्रशिक्षण केंद्राला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 15:17 IST

Shambhuraj Desai Karad Satara-कोयनानगर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या उभारणीला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. या उपकेंद्रासाठी ६५ एकर जागा लागणार असून कोयना प्रकल्प व महसुल विभागाकडे वापरात नसलेली जागा मोठ्या प्रमाणात आहे. ही जागा गृह विभागाला हस्तांतरीत होणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देपोलीस प्रशिक्षण केंद्राला मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नलकोयनानगरला प्रकल्प : ६५ एकर जागा गृह विभागाकडे होणार हस्तांतरीत

कोयनानगर : कोयनानगर येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या पोलीस प्रशिक्षण उपकेंद्राच्या उभारणीला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे. या उपकेंद्रासाठी ६५ एकर जागा लागणार असून कोयना प्रकल्प व महसुल विभागाकडे वापरात नसलेली जागा मोठ्या प्रमाणात आहे. ही जागा गृह विभागाला हस्तांतरीत होणे गरजेचे आहे.कोयनानगर येथे गृह विभाग पोलीस प्रशिक्षण उपकेंद्र उभारणार आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या प्रस्तावित प्रकल्पाच्या उभारणीसाठी महत्वाची बैठक व तो उभारणीसाठी जागा पाहणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वत: करून त्याला पसंदी दिली आहे.

यावेळी त्यांच्यासोबत पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, कोयना प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, सहायक वनसंरक्षक सुरेश साळुंखे, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोकराव थोरात, कोयना प्रकल्पाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वैभव फाळके, शिवदौलत बँकेचे संचालक अशोकराव पाटील, सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी उपस्थित होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोयना दौºयावर आले आसताना त्यांना या बहुउद्देशीय प्रकल्पाच्या प्रस्तावाबाबत माहिती दिली होती. मुख्यमंत्र्यांना ही संकल्पना आवडली. त्यांनी याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. हा प्रकल्प लवकरात लवकर उभारण्यासाठी तातडीने आराखडा तयार करा, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

प्रकल्पासाठी ६५ एकर जागा लागणार आहे. ती जागा कोयना प्रकल्पाने तातडीने द्यावी. म्हणजे हा बहुउद्देशीय प्रकल्प उभारणीसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतुद करता येणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगीतले.प्रारंभी भाडेतत्वावर सुरू होणार केंद्रसद्यस्थितीत हा प्रकल्प सुरु करण्यासाठी कोयना प्रकल्पाने रस्ते, वीज, पाणी, इमारती या आवश्यक असणाऱ्या बाबी भाडेतत्वावर गृह विभागाला उपलब्ध करुन द्याव्यात. या वसाहतीची देखभाल व दुरुस्ती गृह विभाग करुन हे केंद्र तात्पुरते चालु करेल. इमारत उभारणी झाल्यावर स्वत:च्या जागेत हे केंद्र स्थलांतरित होईल, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliceपोलिसShambhuraj Desaiशंभूराज देसाईSatara areaसातारा परिसरKoyana Damकोयना धरण