शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
4
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
5
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
6
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
7
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
8
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
9
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
10
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
11
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..
12
Food Recipe: प्यायला चविष्ट, करायला सोपं आणि पचायला हलकं, मुगाचं पौष्टिक कढण! 
13
'अटी लागू होतील...', भारत-अमेरिका व्यापार करारावर केंद्र सरकारची पहिली प्रतिक्रिया
14
बँक बॅलन्स झिरो असला तरी मिळेल 2 लाखांचा विमा, १० हजारांचं कर्ज; 'या' सरकारी योजनेत करा अर्ज
15
चीननं ठेंगा दाखवला तर एकत्र आले भारत आणि जपान, मुकेश अंबानीही संधीचं सोनं करण्याच्या तयारीत
16
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
17
‘ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे'; धर्मपुरीत दिसला भक्तीचा सोहळा
18
'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा
19
Viral Video : टेक्नोलॉजिया! एक पंखा अन् तीन खोल्यांमध्ये गारेगार वारा; देशी जुगाड पाहून तुम्हीही कराल कौतुक
20
तुकोबांच्या अभंगातून उत्तर देत धनंजय पोवारनं मटण खाण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांचं केलं प्रबोधन, म्हणाला "सज्जन कसायाबरोबर मांस विकु लागला..."

मुख्यमंत्री रमले स्टॉबेरीच्या शेतात, गावच्या यात्रेसाठी दाखल: आपल्या लोकांमध्ये आल्याचे समाधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 20:09 IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून आपल्या दरे या मूळ गावी शेतीची पाहणी केली.

बामणोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसाच्या सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून आपल्या दरे या मूळ गावी त्यांनी शेतीची पाहणी केली. राजकारणातून ब्रेक घेत शिवारात राबले. त्यांनी चार महिन्यांपूर्वी लावलेल्या स्ट्रॉबेरीला आता लाल चुटूक फळे आली आहेत. ही स्टॉबेरी त्यांनी हाताने तोडून त्याची चव चाखली. रोजच होत असलेलं राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीतून ब्रेक घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या मूळ गावी शेतात रमले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जी पिक घेतली जात नाही त्या पिकांची लागवड चक्क आपल्या शेतात केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरे या मूळगावी दाखल झाले असून पुढील २ दिवस ते गावी मुक्कामी असणार आहेत. उत्तेश्वर या ग्रामदैवताची यात्रा असल्याने ते यात्रेला उपस्थित राहणार आहेत.. या भागातील १० गावांची यात्रा असल्याने मोठे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी रात्री ९ पासून यात्रेच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून रात्री उशिरापर्यंत ही यात्रा चालणार आहे. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी गावाकडील घराच्या परिसरात फेरफटका मारून बांधकामाचा देखील आढावा घेतला.

शेतात स्वत: काम केलं पाहिजे

“आपण शेतात स्वत: काम केलं पाहिजे. तेव्हा आपण दुसऱ्याला सांगू शकतो. नवं तंत्रज्ञान वापरायला हवं. आपण इथे ते वापरलं आहे. ठिबक सिंचनने एकाच वेळी सगळ्याच झाडांना पाणी मिळतं”, असं मुख्यमंत्री म्हणाले. “मला गावाची ओढ आधीपासून आहे. मी वर्षातून एक-दोन वेळा तरी गावाला भेट देतो. त्यामुळे मी वेळ काढून इथे आलो. इथे छान वाटतं. निसर्गरम्य वातावरण आहे. वाहनं नाहीत, मोबाईलची रेंज पकडत नाही. शांतता आहे, प्रदूषण नाही, आवाज नाही. शांततेचा अनुभव घ्यायला मिळतो”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या शेतात कोणती पिकं?मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शेतात कोणतंच रासायनिक खत वापरलेलं नाही. त्यांच्या शेतामध्ये लवंग, वेलची,दालचिनी, कॉफी, पेरू, आंबा, फणस, चिक्कू, सफरचंद, स्ट्रॉबेरी, मिरची, हळद या सह लाल चंदन, बाहेरच्या राज्यात पिकणारे गवती चहा अशा विविध प्रकारच्या झाडांमधून त्यांनी आपली संपूर्ण शेती फुलवली आहे. एकनाथ शिंदेंच्या शेतामध्ये असलेलं गवती चहाचं पिक आगळं वेगळं आहे. या गवती चहाची उंची तब्बल १० फुट आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSatara areaसातारा परिसर