शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याला पडलेले भगदाड तीन तासांत बंद, लोकसहभागातून उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 11:02 IST

अवकाळी पावसाने माण नदीला महापूर आला आणि कधीच न भरलेला बंधारा अवघ्या तासाभरातच भरला. शेतकरी आनंदले खरे; पण या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने या आनंदावर विरजन पडले. मात्र, यामुळे खचून न जाता नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होताच ग्रामस्थांनी लोकसहभागातून अवघ्या तीन तासांत बंधारा तुंबवला. त्यामुळे रिकामा झालेला बंधारा आता पाण्याने भरणार असल्याने गोंदवलेकरांचे चेहरे पुन्हा खुलले आहेत.

ठळक मुद्देबंधाऱ्याला पडलेले भगदाड तीन तासांत बंद, लोकसहभागातून उपक्रमबंधारा पाण्याने भरणार असल्याने गोंदवलेकरांचे चेहरे खुलले

दहिवडी : अवकाळी पावसाने माण नदीला महापूर आला आणि कधीच न भरलेला बंधारा अवघ्या तासाभरातच भरला. शेतकरी आनंदले खरे; पण या बंधाऱ्याला भगदाड पडल्याने या आनंदावर विरजन पडले. मात्र, यामुळे खचून न जाता नदीच्या पाण्याचा प्रवाह कमी होताच ग्रामस्थांनी लोकसहभागातून अवघ्या तीन तासांत बंधारा तुंबवला. त्यामुळे रिकामा झालेला बंधारा आता पाण्याने भरणार असल्याने गोंदवलेकरांचे चेहरे पुन्हा खुलले आहेत.दुष्काळी माणला पाणी मिळावे म्हणून जिहे-कटापूर योजनेतून माण नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यापैकीच गोंदवले बुद्रुक येथील इनाम शिवाराजवळ देखील एक बंधारा आहे. या बंधाऱ्याला पूर्वी लोखंडी फळ्या होत्या. त्याही वेळेत बसविल्या जाण्यात दिरंगाई होत होती.

तसेच फळ्या बसविल्यानंतरही मोठ्या प्रमाणात गळती होऊन पाणी वाया जाई. त्यामुळे हा बंधारा पाणीसाठा होण्यासाठी फारसा उपयोगी पडत नव्हता. बंधाऱ्यांची दुरुस्ती करावी, यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनदेखील काहीच हालचाल होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी लोकसहभागातून डागडुजी केली.कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या लोखंडी फळ्यांच्या जागी काँक्रिटीकरण करून संपूर्ण बंधारा बंदिस्त करण्यात आला अन् बंधारा दुरुस्त झाला. पावसाने मात्र सलग तीन वर्षे ओढ दिल्याने दुरुस्त झालेला हा बंधारा रिकामाच राहिल्याने शेतकरी चिंतेत होते. यंदाच्या पावसाने मात्र बंधारा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून वाहिला.

भविष्यातील शेतीची चिंता आता मिटली असल्याने सर्वांनीच सुस्कारा सोडला खरा; पण नदीला आलेल्या मोठ्या पुरामुळे बंधाऱ्याच्या कडेची माती वाहून मोठे भगदाड पडले. परिणामी अवघ्या तीन ते चार दिवसांतच हा बंधारा पुन्हा रिकामा झाला. त्यामुळे शेतीला पाणी मिळविण्याचा चंग बांधलेले शेतकरी हवालदिल झाले; पण, जिद्द कायम होतीच.

क ाहीही करून बंधाऱ्यात पाणीसाठा करण्यासाठी पुन्हा सर्वजण एकवटले. नदीला पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने बंधाऱ्याचे हे भगदाड बुजविण्यासाठी अडचण निर्माण झाल्याने हा प्रवाह कमी होण्याची वाट पाहत होते. गेल्या चार दिवसांपूर्वी प्रवाह कमी होताच लाभक्षेत्रातील पंचवीस तीस शेतकऱ्यांनी पंचवीस हजारांहून अधिक रक्कम जमाझाली.नियोजनासाठी प्रयत्न गरजेचेमाण नदीला पाण्याची धार सुरू असल्याने आठवडाभरात या बंधाऱ्यात पुरेसा पाणीसाठा राहू शकतो. त्यामुळे या बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रातील पाण्यावाचून पडून असणाऱ्या सुमारे पन्नास एकर शेतजमिनी ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु भविष्यातील पाण्याच्या नियोजनासाठी या बंधाऱ्याला अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. 

इनाम शिवारातील शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी या एकमेव बंधाऱ्याचा उपयोग होतो. त्यामुळे आम्ही शासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकसहभागातून तातडीने या बंधाऱ्यांची डागडुजी केली आहे.-बाळासाहेब पाटील,शेतकरी, गोंदवले बुद्रुक

टॅग्स :WaterपाणीSatara areaसातारा परिसर