शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

हजारो फूट खोल दरी, कड्यावर क्लाइंबिंग-रॅपलिंग

By admin | Updated: January 7, 2015 23:54 IST

सह्याद्री ट्रेकिंग : लोण्यावळ्याजवळ केले साहस

सातारा : सातारा जिल्ह्यातील सह्याद्री ट्रेकिंग या संस्थेच्या गिर्यारोहकांनी नवीन वर्षात साहसी थरारक क्लायबिंग, रॅपलिंग, ट्रेकिंग केले. त्यासाठी लोणावळ्याजवळील ‘ड्युक्स नोज’ या भव्य भिंतीसारख्या सरळ उंच, उभ्या कड्याची निवड केली. खंडाळा घाटातून मुंबईला जाताना अनेकांनी याचे रौद्ररूप पाहिले आहे. हा कडा नुसता जवळ जाऊनही पाहणं सर्वसामान्यांच्या छातीत धडकी भरवणारं आहे. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या ‘ड्यूक्स नोज’चं टोक व त्यासमोरील हजारो फूट खोल दरीचा प्रचंड घसारा पाहूनच डोळे फिरतात. या कड्याच्या चढाईमार्गापर्यंत जाताना सुद्धा धोकादायक दिव्य पार करावं लागतं. कड्याच्या पोटात निर्माण झालेल्या निमुळत्या मार्गावरून चालत, तोल सावरत, सरपटत, वाकून काळजीपूर्वक चालावं लागतं. एक चूकही मृत्यूचे दार दाखवते. ‘भयानक’ या शब्दाची प्रचिती तेथे गेल्यावरच कळते. अशा या कड्यावर येथील सह्याद्री ट्रेकिंगचे कैलास बागल, अमीर नदाफ, प्रतीक साळुंखे, अनिकेत कोदे, प्रणव महामुने यांनी चढाई करणे, कडा उतरणे, पुन्हा जुमरिंग करत चढण्याचा निश्चय केला. त्यानुसार प्रथम कैलास बागल यांनी चढाई मार्गाची सुरुवात करून दिली. त्यानंतर अमीर नदाफने आघाडी सांभाळत २७० फुटांपर्यंतची चढाई यशस्वी केली. त्याला इतरांनी साथ दिली. या साहसवीरांचे कौतुक होऊ लागले आहे. (प्रतिनिधी)तोंडभरून कौतुक...‘ड्युक्स नोज’ कड्यावर पर्यटनासाठी आलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांनी वरील सह्याद्रीवीरांचे तोंडभरून कौतुक केले. या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल साताऱ्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या गिर्यारोहकांचा सत्कार करून गौरव केला. लोणावळ्याजवळील हा कडा जवळ जाऊनही पाहणं सर्वसामान्यांच्या छातीत धडकी भरवणारं आहे. आकाशाशी स्पर्धा करणाऱ्या ‘ड्यूक्स नोज’चं टोक व त्यासमोरील हजारो फूट खोल दरीचा प्रचंड घसारा पाहूनच डोळे फिरतात. या कड्याच्या चढाईमार्गापर्यंत जाताना सुद्धा धोकादायक दिव्य पार करावं लागतं. कड्याच्या पोटात निर्माण झालेल्या निमुळत्या मार्गावरून चालत, तोल सावरत, सरपटत, वाकून काळजीपूर्वक चालावं लागतं.